(चंद्रपूर विशेष): कोरोना ने प्रवेश न केलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा! विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील चार जिल्ह्यामध्ये हा मानवनिर्मित रोग पसरलाचं नाही. नुकतेच भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मिळाले आणि विदर्भात तीन जिल्हे ग्रीन जिल्हे म्हणून ओळखले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याने ग्रीन झोन अशी आपली ओळख "जशीच्या-तशी ठेवावी" यासाठी सर्व स्तराचे प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे, त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे ऑनलाइन "कोरोना प्रश्नमंजुषा" हि आहे. तशी चंद्रपूरची ओळख सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून संपूर्ण भारतामध्ये आहे. परंतु आत्ता आलेल्या या रोगाला चंद्रपूरकरांनी प्रवेश करू दिला नाही, ही बहुतेक चंद्रपूरसाठी संपूर्ण भारतामध्ये एक नवीन ओळख निर्माण होईल. प्रशासकीय अधिकारी, शासन, प्रशासन, जिल्ह्यातील नागरिक, पोलीस विभाग, आरोग्य विभाग हे सगळेच प्रशंसेचे पात्र आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील जिल्हाधिकारी म्हणून लाभलेले डॉक्टर कुणाल खेमनार व पोलिस अधिकारी म्हणून चंद्रपुर जिल्ह्याला लाभलेले डॉक्टर महेश्वर रेड्डी हे दोन आयएएस व आयपीएस अधिकारी यांची एक विशेष ओळख यानिमित्ताने भारताला झाली आहे. ग्रीन झोन जिल्हा असतानाही अभिनव पद्धतीने जनजागृती करण्याचे त्यांनी केलेले-करीत असलेले कार्य अभिनंदनीय आहे. आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायं. 6-53 मिनिटांनी शासनाच्या अधिकृत मेलवर कोरोना संबंधित ऑनलाइन प्रश्नमंजुषा प्रकाशित झाली, बातमी स्वरूपात ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 25 प्रश्न असलेले 50 मार्क ची ही प्रश्नावली, कोरोना संबंधात साधारण ऐकलेल्या प्रश्नावर आहे. आज वृत्तपत्र बातम्या, न्यूज चॅनल, सोशल मीडिया यावर ऐकण्यात येणारे प्रश्न या प्रश्नमंजूषामध्ये आहेत. जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य नागरिकांना कोरोना आजार कळावा, कोरोना आजाराची वैशिष्ट्ये, प्रतिबंधात्मक उपाय व नागरिकांच्या मनामध्ये असणारे सर्वसामान्य प्रश्न, उत्तरा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत या ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. अँड्रॉइड मोबाईल वर प्रश्न ची लिंक देऊन प्रश्न सोडविण्याची केलेले आव्हान या गंभीर वाटणाऱ्या आजाराची जनजागृती व सामान्यांना असलेले ज्ञान यावर आधारित आहे. या प्रश्नाचे ऑनलाइन प्रश्नपत्रिका 7.13 ला पाठविण्यात आले. 60 टक्के पेक्षा जास्त मार्क प्राप्त करणाऱ्यांना प्रशासनाचे प्रशस्तीपत्र मिळणार असे आव्हान याठिकाणी करण्यात आले होते. 7.13 ला सोडविलेला आँनलाईन पेपर चे सर्टिफिकेट्स 7.18 ला ईमेलवर प्रकाशित करण्यात आला. कोरोना विषयी स्वत:चे ज्ञान वाढविणारा, समाजाला बळकटी देणारा व गैरसमजाला दूर करणारा अभिनंदनीय असा हा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्न ग्रीन झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना, covid-19 याविषयीची असलेली माहिती, त्याचे ज्ञान यासंदर्भात आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन यानिमीत्ताने करावेसे वाटते.
असे होता येणार सहभागी:
ऑनलाईन प्रश्नमंजुषा फॉर्म आपण मोबाईल, संगणक द्वारे सबमिट करू शकता. सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये भाग घेण्याकरिता https://forms.gle/8vGMTDLmKSj8P1qV6 या लिंक वरून कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा फॉर्म सबमिट करावयाचा आहे. 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच व्हिव स्कोर मध्ये आपले गुण व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता. प्रश्नमंजुषेची लिंक chanda.nic.in तसेच www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि District Corona Control Cell या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. प्रश्नमंजुषेची लिंक chanda.nic.in तसेच www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि District Corona Control Cell या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.. या प्रश्नमंजुषा मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. ग्रीन, येलो, रेड झोन हे आत्ता-आत्ताचं ऐकायला येणारे शब्द आहेत. कोरोनटाईन, होम कोरोनटाईन, आयसोलेशन हे शब्दही आत्ताचं आपण ऐकत आहोत. सर्दी, ताप, खोकला, पडसे ही भारतीयांना होणारी साधारण बिमारी घरातले आजार आहेत, परंतु चीनच्या स्वार्थी वृत्तीने संपूर्ण जगात सह भारतालाही घेरले आहे. भारतीयांच्या घरातील आजार हा आज जीवघेणा व शेजाऱ्यांकडे ही संशयाने बघण्याचा झाला आहे. त्यापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रत्येकांनी या प्रश्नमंजूषा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या निमीत्ताने करावेसे वाटते.
0 टिप्पण्या