(गडचांदूर विशेष)
औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले गडचांदूर शहर, शहराची ओळख सिमेंट नगरी म्हणून आहे परंतु बेरोजगारी हा या शहरातील कळीचा मुद्दा आहे. "स्थानिक उपाशी बाहेरचे तुपाशी" अशी या नगराची स्थिती आहे. संचार बंदीनंतर जिल्ह्यामध्ये अनेक चुकीचे व्यवसाय बंद झालेत. परंतु "विशिष्ट लोकांना, विशिष्ट सुविधा" पुरविण्यात आघाडीवर असलेले गडचांदूर पोलीस नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय राहिला आहे. सुगंधित तंबाखूवर संचारबंदी नंतर राज्यात कडक बंदी आणण्यात आली. या बंदी नंतरही पानटपरी धारक लपून-छपून शौकिनांच्या गरजा जास्त दराने पूर्ण करीत आहे. गडचांदुर ही यात मागे राहिले नाही. या शहरात राजकीय वशिला असलेला एक व्यवसायी, पान मटेरियल च्या ठोक व्यवसायात या काळात चर्चेमध्ये आहे. आता बालवयात असलेल्या गडचांदूर नगरपरिषद मध्ये कंत्राटी कामामुळे या महाभागाचे (महाठगाचे) संबंध राजकीय पुढारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी यांचेशी आलेला आहे. आपल्या संबंधाला व्यवसायात "कॅश" करण्यामध्ये माहीर असलेला हा महाठग आता गडचांदूर शहरामध्ये पान मटेरियल चा ठोक व्यापारी-व्यवसायी म्हणून कार्य करित आहे. अवाच्या-सव्वा दराने बंदी असलेला सुगंधी तंबाखू, पान टपरीसाठी वापरण्यात येत असलेले पान मटेरियल साठी लागणारे साहित्य मनमुराद-खूलेआम विक्री करित आहे. या व्यवसायातून लाखो रुपयाची कमाई या महाठगाची सुरू आहे. आपला राजकीय वशिला मोठा आहे, हे दाखवून त्याचा सुरू असलेला व्यवसाय आणखी जोमाने वाढविण्यात सध्या मग्न असलेला हा "विशिष्ट वर्गाचा" व्यापारी गडचांदूर मध्ये धनाने चर्चिला जात आहे. संचारबंदी नंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्त असताना ही हा व्यावसायिक आपला व्यवसाय खुलेआम कसा काय करिता आहे, यांची चर्चा आज गडचांदूर शहरात जोमाने सूरू आहे. अवघ्या काही व्यासाचा गडचांदूर शहर! शहरामध्ये असलेली पोलीस चौकी, त्यांचे चोर-उचक्याशी असलेले हित-संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. संचार बंदीनंतर पोलीस विभागाचे राज्यांमधील, देशामधील कार्य हा सलामी ठोकण्या जोगे आहे. परंतु मोजके भ्रष्ट-बेईमानांमुळे या विभागाला नेहमी संशयाच्या नजरेने बघितले जाते. संचारबंदी नंतर आपल्या विविध गैरकृत्यामुळे गडचांदुर पोलीस विभाग चर्चेचा विषय राहिला आहे. गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती व त्यांच्या लीला या वृत्तांच्या माध्यमातून चव्हाट्यावर येत आहेत. चोरीच्या कोळशाच्या तपास असो, गडचांदुर मार्गावर पकडलेली अवैध दारू-त्यात झालेला लाखोंचा व्यवहार हा सगळा पो.नि. गोपाल भारती यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. गडचांदूर मार्गावर जप्त करण्यात आलेली हा दारू चा "हाय प्रोफाईल जखिरा", त्यावर करण्यात आलेली थातूर-मातूर कारवाई, त्यात झालेला लाखोचा व्यवहार हा येणाऱ्या काळात गोपाल भारती व त्यांच्या साथीदारांसाठी डोकेदुखी ठरणारा विषय आहे. गडचांदूर शहरामध्ये शहरातीलच स्वतःला राजकीय पुढार्यांच्या "वरदहस्त समजणारा विशिष्ट तबक्यातील या महाठगाच्या" ठोक पान मटेरीयल व्यवसायाला गडचांदूर चे पोलीस निरीक्षक भारती यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, असे गडचांदूर मध्ये दबक्या स्वरात बोलले जात आहे.
संचार बंदीनंतर अनेक व्यवसाय हे बंद पडले आहेत, ठप्प झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भुरट्या व मोठ्या चोऱ्या कमी झाल्या आहेत, मग लॉकडाऊन मध्ये हे चोर स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करीत आहे, हा विचार करण्याजोगा विषय आहे. छोट्या-मोठ्या चोरांनी चोऱ्या बंद केले मात्र व्हाईटकॉलर, स्वतःला समाजसेवक समजणारे व नेत्यांसोबत उठ-बैठ असणाऱ्यांनी मात्र "पुढे पाठ, मागे सपाट" या म्हणीप्रमाणे आपले काळे व्यवसाय सुरू ठेवले आहेत. समोर समाजसेवेच्या गोष्टी करायच्या मागे काळे धंदे सुरू ठेवायचा, हा यांचा जागतिक तोरा! असे एक ना अनेक शहरात, गावात, जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळेल. या "कारतोंड्यांचा" व्यवसाय काय आहे, हे साऱ्यांनाच माहित आहे, पण खोकलणार कोण? या सफेदपोशांची उठ-बैठ राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत आहे. हे कुणा एका जिल्ह्यासाठी, शहरासाठी, भागासाठी नाही प्रत्येकचं विभागात आपल्याला हे बघायला मिळत आहे.
0 Comments