रय्यतवारी कॉलरीमधून घेतले आरोपीस ताब्यात!
चंद्रपूर : आज गुरूवार दि. ०६ आॅगस्ट २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना रामनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी नामे रोहित उर्फ पंडीत दिनेश शर्मा (३२) रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर हा घातक शस्त्रे घेवुन रयतवारी कॉलरी परिसरात कोणतातरी हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या उददेशाने फिरत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने रयतवारी डिस्पेंसरी चौक येथे पोहचुन चौकशी केली असता, अंधारात संशयास्पदरित्या वरील आरोपी हा उभा दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपीस ताब्यात घेवुन झडती घेतली असता, त्याचे ताब्यात एक विदेशी बनावटीची पिस्टल आणि एक धारदार गुप्ती असे शस्त्र मिळुन आल्याने सदर शस्त्राच्या परवानाबाबत विचारपुस केली असता त्यांने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने आरोपी नामे रोहित उर्फ पंडीत दिनेश शर्मा, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास अटक करून पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गून्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपी कडुन एक विदेशी बनावटीची पिस्टल किं. १०,०००/-रू आणि एक गुप्ती किं. ५००/- रू १०,५००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. असा एकुण
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. महेश्वर रेड्ड्ी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि, श्री. जितेंद्र बोबडे, पोहवा. धनराज फरकाडे, संजय आतकुलवार, पोशि. प्रशांत नागोसे, गोपाल आकुलवार अमोल धीरे, रविंद्र पंधरे यांनी पार पाडली.
0 Comments