- नगरसेवक डोहे व मोरे यांचे नेतृत्वात आकाश्यात काळे फुगे सोडून केला निषेध !
- दुर्लक्ष राहिल्यास मोठे आंदोलन पुकारण्याचा इशारा !
गडचांदूर : गडचांदूर नगर परिषद ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० ला पार पाडली. तेव्हा गडचांदूर शहरातील नागरिकांनी मोठया अपेक्षानी कांग्रेसच्या सौ. सविताताई टेकाम यांना थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले परन्तु आठ महिन्याच्या कार्यकाळ लोटला परन्तु त्यांना प्रशासनला हाताळणे अजूनही जमले नाही. प्रशासनावर आपली छाप उमटवु शकल्या नाही. त्यामुळे प्रशासन मुजोरीने वागणूक देत आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रभाग क्र. एक व दोन मध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून आले व त्यांना जनतेनी बहुमत न दिल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. सदर प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने त्या प्रभागात मागील चार पाच महिन्यापासून नाली सफाई नाही , फवारणी नाही, घंटागाडी नियमित येत नाही त्यामुळे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी वारंवार निवेदन दिले तोंडी माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शेवटी त्यानी दि. २४/८/२०२० पर्यंत प्रभाग क्र. एक व दोन मध्ये नाली सफाई, फ्यागिंग मशिनने फवारणी, व नियमित घंटागाडी पाठविले नाही तर नगरसेवक अरविंद डोहे ,रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात जनतेच्या सहकार्यातून आकाश्यात काळे फुगे सोडून,ठिकठिकाणी काळे झेंडे व फलक लावून नगर परिषद शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करणार असल्याचे पत्र मा. मुख्याधिकारी तथा नगराधक्ष्य यांना दिले परन्तु ते नगरपरिषद चे विरोधी नगरसेवक असताना सुद्धा त्याचे प्रभागात काम करण्यात आले नाही व त्यांना साधे पत्र देऊन निषधा बाबत समज देऊ शकले नाही ही नगर परिषद शासन व प्रशासनाची मुजोरी पाहून शेवटी भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात आज काळे फुगे आकाशात सोडून,ठिकठिकाणी फलक लावून,काळ्या पट्टा लावून ,झेंडे लावून,काळे मास्क लावून शासनाच्या नियम अटी चे पालन करून नगर परिषद च्या शासन प्रशासनाचा विरुध्द जाहीर निषेध करण्यात आला.हे शासन प्रशासनाला हा संदेश असून यानंतर ही असेच दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करू असे अरविंद डोहे आव्हाहन केले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते महेशजी शर्मा,शिवाजी सेलोकर, अरविंद डोहे नगरसेवक रामसेवक मोरे ,सतीश उपलेंचिवार,निलेश ताजने,हरीश घोरे,संदीप शेरकि,अरविंद कोरे,बबलू रासेकर,अजीम बेग,कुणाल पारखी,सुयोग्य काँगरे,विनोद कावळकर,सुनील जोगी,परशुराम मुसळे,सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष,सौ रंजना मडावी,आदी उपस्थित होते.
0 Comments