माजलेल्या रेती तस्करांची अशी ही दादागिरी !
  • तलवारीचा धाक दाखवुन जप्त वाहन नेले पळवुन !
  • अवैध रेती वाहतुक प्रकरणी गुन्हा दाखल !
  • शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींविरुद्ध बल्लारपूर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल !

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करी, दारु तस्करी यांना ऊत आला आहे. निर्ढावलेले रेती तस्कर अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास मागे पुढे पाहत नाही. यापूर्वीही रेती तस्करांनी चंद्रपुरातील एका तहसीलदारावर हल्ला केला होता. रेती तस्करी मधून मिळणारी अमाप माया व त्यामुळे आलेला माज यातून असले प्रकार घडत आहेत. यावर त्वरित निर्बंध न आणल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतील या संशय नाही. नुकतेच बल्लारशा वन क्षेत्रातून रेती तस्करी करणाऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून पकडलेले रेतीचे ट्रॅक्टर पळवून नेले. जिल्ह्यात अपराधी प्रगतीच्या अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यावर त्वरित अंकुश बसविणे गरजेचे आहे.


बल्लारपुर : दिनांक २५/०९/२०२० ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बल्लारशाह कक्ष क्र. ४९४ मध्ये असलेल्या नाल्यात खोदकाम करुन रेती ट्रक्टर क्र. MH-३४ L-९४६८ मध्ये भरुन वाहतुक करीत असतांना बल्लारशाह चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह नरेश भोवरे, वनरक्षक पिंपळकर, टेकाम, सुरवसे यांनी सरकारी जंगलामधील रेती अवैधरित्या उत्खनन करुन ट्रक्टर मध्ये भरले असता मौक्यावरील वाहन ताब्यात घेऊन जप्ती कार्यवाही करुन नेत असतांना ४ -५ मोटार साईकलस्वार जंगलात पोहचले. सदर इसमांकडे सत्तुर, तलवार, लाकडी फरें, दगड इत्यादी हत्यार होते. त्यापैकी दोघांनी आपले नाव नामे १. रुपेश मोरे, २. मनोज क्षिरसागर असे मौक्यावर सांगीतले. आमची ट्रक्टर सोडा नाहीतर तुम्हा सर्वांना इथेच तलवारीने मारुन फेकतो. प्रसंगवधान ठेवुन आपला व आपल्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात न घालता सदर ट्रक्टर नेतांना अडथळा न करता भिती पोटी आमचेकडुन आरोपींनी जप्तीमधील ट्रक्टर बळजबरीने ताब्यात घेऊन हत्यारांचा धाक दाखवुन पसार झाले.

आरोपी नामे रुपेश मोरे व मनोज क्षिरसागर आरोपींवर वनविभागातर्फे भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, २६(१) डी, २, २६(१) जी, ४१,४२ आणि ५२ अन्वये वनगुन्हा क्रमांक १२/१४ दिनांक २६/०९/२०२० नोंद करण्यात आला. तसेच पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे संबंधित आरोपी यांचेवर भारतीय दंड संहिता ३७९,१८६,५०६,३४ व भारतील हत्यार कायदा १९५९ कलम ४,२५ अन्वये जप्त शासकिय संपत्तीची चोरी करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची कलमे लावुन पोलिस स्टेशन बल्लारपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक भगत प्रकरणाचा तपास करीत आहे.

सदर वनगुन्हा प्रकरणी उपवनसंरक्षक मध्य चांदा अरविंद मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह करीत आहे.,

Post a Comment

0 Comments