चंद्रपूरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठा उपलब्ध !
  • कोविड रूग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दराने घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !
  • वितरणात अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन /घाऊक विक्रेते यांचेवर नियमानुसार कार्यवाहीचेआदेश !

चंद्रपूर : आज दिनांक 20.4.2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालय निहाय वाटप सोबतच्या करण्यात आलेले आहे. तरी संबंधीत कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठदार नुसार त्यांचेकडून तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नसून कोणत्याही प्रकारची दिरंगाई, टाळाटाळ, कसूर होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेते यांनी घ्यावे, अश्या सुचना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे परीपत्रक जा.क्र. कोविड 19/रेमडेसिवीर याप्रमाणे इंजेक्शन / 102-21, दिनांक 5.4.2021 2. या कार्यालयाचे आदेश क्र. काविआव्य/कोविड विषाणू/2021/500 दिनांक 15.4.2021 या पत्रान्वये केल्या आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संबंधित कोवीड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रुग्णालयाच्या लेटर हेड वर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय / वाजवी दरात करणे आहे.

चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांनी याबाबत व संबंधीत आरोग्य यंत्रणेचे प्राधिकृत आरोग्य अधिकारी यांनी सदर वितरण तक्त्यानुसार वाटप होत असलेची व सदर वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करून अनियमितता आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशा सुचेना ही या पत्रकात करण्यात आल्या आहेत.


वितरणात अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन /घाऊक विक्रेते यांचेवर नियमानुसार कार्यवाहीचेआदेश !

वरील संदर्भीय क्र. 2 मधील भरारी पथकांनी वाटप तक्त्यानुसार वाटप व विनियोगाबाबत खातरजमा करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन /घाऊक विक्रेते यांचेवर नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश ही पत्रात दिले आहे. आज 21 एप्रिल रोजी चंद्रपूर घ्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे.

Post a Comment

0 Comments