सरकारी मदत !**********************
😀 सरकारी मदत 😀
*****************
सरकारी मदत मिळणार म्हणून
जिल्ह्याच्या ठिकाणी गेला
गेल्या पावली तसाच
हात हालवत परतला
राब राब राबला
नांगर त्यानं जुपला
ऊन्हातान्हा मधी
घाम गाळून झिजला
फुलला होता शिवार
पावसान मारल
होत नव्हत सार
गारपिटीन नेल
पोटात नव्हता दाणा
पाणी पेत होता
हाती नव्हता पैसा म्हणून
पायीच चालत होता
रस्त्यात आली भोवळ
झाडाखाली झोपला
अधिकारी सांगत आहे
दारू पिऊन मेला
- रमेश कृष्णराव भोयर, भद्रावती
मो.न. 7058077746
जिल्हा चंद्रपुर महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments