बाकी सरकसची भाषा लिवलन,
ताई, आमी जवा लहान होतुन
तवा चांद्याच्या महाकालीच्या जत्रेत अशा हत्ती- वागाच्या कला पहाले भेटाच्या.
आता थे
दिवस गेले नं टिवी मोबाईलवर
सरकस पावाचे दिवस आलेत.(-सुखदेव चौथाले, यांनी व्यक्त केलेली बोलकी प्रतिक्रिया)
चाल ना सखू जत्रलं,तुलं दाखवतो जत्रा.
दोघं जाउ अशा मज्जा करु पन
नोको घालु व इसरा!
जत्रमंदी लै भीड रायते
अशा चोर बी येते.
हौसे गवसे, नव्हे येतेत
अना चोरी करून जातेत.
जत्रमंदी एक आरशाची गंमत रायते.
आपला तोंड हातभर उभा अना
हातभर आडवा पाउन लै हासा येते.
अर्धी पोरगी अना अर्धी मच्छी पाउन
नवलस वाट्टे अना
मौत का कुव्व्यात फटफटी
वद्र खाली चालवते तर भेवच लागते.
जत्रमंदी सर्कस पाउ,
आस्वल सायकल चालवणे,
हत्ती पुंजा करते,
वाघ सिंव बी रिंगमास्टर सांगावं तसं करते.
लान मोठे पोरं पोरी कसरत करते
जोकर हासवते,
लै उचावरच्या झोक्यावर कसरत
करुन झोके घेते.
तूज्या लानशा गावालं कोटची जत्रा व सखू
चाल चाल मायाबरं नोको करु कां.कू...!
जत्रमंदी का का रायत नाही
सप्पा सामान रायते पर
सामान सुमान नाही घेऊ लै पैसे लागते
नक पालीस, वट पालीस पावडर नाही घेऊ.
जीवाची जत्रा करू घुमुनच येऊ.
जत्रमंदी येक सीनीमा बी पाऊ
हीरो, हीरोइन कसे नाचतेत
तसे नाचु न गाऊ
असा मनुन तीचा हात हातात घेवून
येक मारली गिरकी अना
साडसूड बदकन पडलो बाजच्या खालती.
कवायित्री-शशीकला गावतुरे, मुल
0 Comments