Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

शब्द जरासे विचार काही सोबत घेतो !




शब्द जरासे विचार काही सोबत घेतो
एक लेखणी थोडी शाई सोबत घेतो

शहराच्या गर्दीत हरवतो वाटत जाते
म्हणून गावामधली आई सोबत घेतो

चमत्कार मी नव्या युगाचे ऐकत आलो
पुस्तकातली ती नवलाई सोबत घेतो

तिला इशारे कळत नसावे गुलाबातले
अंगणातली म्हणून जाई सोबत घेतो

किती जाळतो ग्रीष्म कोरडा अंगांगाला
झाडीमधली मग वनराई सोबत घेतो

राम कृष्ण अन् देवदिकांना आर्जव झाले
कंटाळत मग शिवमाराई सोबत घेतो

प्रशांत भंडारे, 91 87884 60242

Post a Comment

0 Comments