लिखीतवाड्यानंतर आता घाटकुळ चा रेती घाटाचा पडशा पाडायला तीच टोळी सक्रिय !वाळु तस्करी तालुका स्तरीय समिती'चा कारभार मालसुताऊ?

स्थानिक नेत्यांच्या स्वतःच्या गाड्या रेती तस्करीत !

लिखीतवाड्यानंतर आता घाटकुळ चा रेती घाटाचा पडशा पाडायला तीच टोळी सक्रिय !

गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा रेती घाटाचा उपसा केल्यानंतर तीच टोळी आता पोंभूर्णा तालुक्यातील रेती घाटकुळ रेतीघाटाचा पडशा पाडण्यासाठी तयार झाली असुन लिखीतवाडा येथे १८५५१ ब्रास रेतीचा उपसा करण्याचा परवाना असतांना आतापावेतो शासकीय आकड्याप्रमाणे १५०९१ ब्रास रेतीचा उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असुन मिळालेल्या माहितीप्रमाणे यापेक्षा जास्त प्रमाणात उपसा या ठिकाणी रेती तस्करांनी केला असून यासोबतचं डम्पिंग यार्ड म्हणून वापरण्यात येणाऱ्या व जवळचं लागून असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील लिलाव न झालेल्या भिमणी येथे ही उपसा मनमानी उपसा करण्यात आला आहे. आता पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ रेती घाटासाठी १००७१ ब्रास रेतीचा उपसा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर ४३१०९ ब्रास रेतीचा उपसा आत्तापावेतो शासकीय आकडेवारीनुसार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. लिखीतवाडा रेती घाटाचा पडशा पाडणारी 'तीच' टोळी घाटकुळ मध्ये रेतीचा उपसा करीत आहे. गोंडपिपरी तालुक्याचे एसडीओ लिखीतवाडा येथील अवैध रेती उपसा व पोंभूर्णा चे तहसिलदार व अन्य जबाबदार अधिकारी तक्रारी होऊन ही शासकीय नियमाप्रमाणे मोक्का तपासणी करून शासनाकडे अहवाल देण्यास टाळाटाळ करीत आहे. तालुकास्तरीय समितीचा मालसुताऊ कारभाराबाबत याठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


चंद्रपूर (वि.प्रति.)

'उपसु-उपसु, खोदु-खोदु रेती काढा असे धोरण आता सगळीकडे राबविल्या जात आहे. रेती घाट मंजुर झाले तर फक्त पैसा कमाविण्यासाठी असे राजकारण्यांची निती झाली आहे. मंजुर प्रमाणात व ठरवून दिलेल्या शासन नियमाप्रमाणे रेती चा उपसा व्हायला हवा, जेसीबी-पोकलँड चा वापर होऊ नये असे धोरण आहे. गावातील बेरोजगारांना यातुन रोजगार व्हावा असे ही शासनाचे धोरण आहे. यासाठी जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर, ग्रामस्तरावर वेगवेगळ्या समित्या बनवुन त्यांना त्यांचे अधिकार बांधुन देण्यात आले आहे. किती प्रमाणात व किती रेतीचा उपसा व्हायला हवा याचेही नियम नियंत्रण समितीने तयार केले आहेत. ग्रामसभेच्या मंजुरी शिवाय कोणतेही रेतीघाट मंजुर न करण्याचा महत्वाचा निर्णय आहे. त्यासाठी नव्याने समिती बनवून ग्रामदक्षता समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. ज्या गावामध्ये वाळुसाठे असतलि अशा गावात ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी इत्यादींचा समावेश असलेली समिती बनविण्यात आली असुन दर पंधरा दिवसांनी एक बैठ लावुन ग्राम दक्षता समिती त्याचा अहवाल जिल्हास्तरावर किंवा तहसिलदार स्तरावर शिफारशी सादर करण्याच्या दिलेल्या अधिकाराचा ग्राम दक्षता समितीचे सदस्य गैरवापर करीत असल्याचे अनेक रेती घाटामध्ये दिसते.

काम नाही, उपसा रेती नेत्यांचा अलिखीत आदेश !

कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला काम नाही मग घ्या ट्रॅक्टर, जेसीबी-पोकलॅन्ड आणि उपसा रेती व कमवा पैसा असा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मंजुर २१ रेती घाटापैकी बहुतेक सर्वच रेतीघाटाच्या ग्रामसमिती सदस्यांकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहेत आणि रेती घाटातुन मनमानी उत्खनन करून त्याचा साठा कंत्राटदाराकडे केला जात आहे, याला मोठ्या राजकारण्यांची साथ आहे. काही मोजके कंत्राटदार ग्राम समित्यांच्या सदस्यांना हाताशी धरून नद्यांमधून मनमानी उपसा करून नद्यांची पाणी तर दुषित करून राहिले आहेतचं नद्यांच्या प्रवाहाच्या दिशाही बदलवुन प्रदुषणात वाढ करीत आहे. यावर उपाय म्हणून बघण्यात येणाऱ्या सरकारी यंत्रणांना याठिकाणी काही मोजकी कायदेशीर कारवाई करून मोकळे होऊन टिकेस पात्र व्हावे लागत आहे. जिल्ह्यातील मंजुर रेतीघाटामधून ८० प्रतिशत पेक्षा जास्त प्रमाणात रेतीचा उपसा आतापावेतो झालेला आहे. जिह्यातील फक्त एका रेती घाटामध्ये ग्राम दक्षता समितीने ठोस निर्णय घेवून रोजंदारी मजुरी लावुन व फक्त ट्रॅक्टर च्या सहाय्याने रेती चा उपसा केला असुन रेती घाट असलेल्या त्या गावातील रेती घाटावरचं गावात रोजगार तर उपलब्ध झाला आणि रेती घाटाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. असा पवित्रा घ्यायला ग्राम दक्षता समित्यांनी पुढाकार घेतल्यास रेती होणारा अवैध उपसा तर थांबेलचं व पर्यावरणाचा -हास होणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवुन कार्यकर्त्यांना रेती चोरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करणे आता बंधनकारक आहे. ज्या रेती घाटामध्ये नियमबाह्य रेती उपसा होत आहे. त्याठिकाणी रेती घाट कंत्राटाशी पैशाची आर्थिक व्यवहार हा तेवढाच जबाबदार आहे. सध्या 'उपसु-उपसु-खुपसु-खुपसु' रेती काढुन पैसा कमाविण्याचा राजकारण्यांनी उचललेल्या धोरणांने स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी मात्र मालामाल झाले आहे. गोंडपिपरी लिखीतवाडा, पोंभूर्णा घाटकुळ, (लिलाव न झालेले भिमणी) वरोरा (सोईट), भद्रावती, मुल (भादुर्णी), सिंदेवाही(वासेरा), या ठिकाणातील रेती घाटाची स्थिती म्हणजे ग्राम स्तरावर तालुका स्तरीय स्थानिक पुढाऱ्यांसाठी पैसा कमाविण्याचे साधन झाले आहे.

Post a Comment

0 Comments