पाेंभूर्णा शहरातील नाथजाेगी समाजातल्या दहा कुटुंबाला अन्नधान्याची मदत


पाेंभूर्णा :-
कोरोनावायरसने जगात धुमाकूळ घातलेला आहे.  पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केल्यामुळे. सारे कामे ठप्प झाली आहेत. सर्वत्र प्रवाशी वाहने बंद असल्यामूळे प्रवासाचा माेठा पेच पडला आहे.
   पाेंभूर्णा शहरात भटकंती करणारे नाथजाेगी समाजाचे १० कुटुंब मागील दाेन महिन्यापासून उघड्यावर वास्तव्यास आहेत. भिक्षा मागून पाेटाची खडगी भरणारा हा  समाज असून. काेराेनामुळे जी संचारबंदी लागू करण्यात आली त्यामुळे नाथजाेगी समाजातल्या कुटुंबाला बाहेर पडून भिक्षा मागणं व आपला व आपल्या कुटुंबातील सदस्याचे पाेट भरणे मुश्किल झाले हाेते.
 तहसिलदार यांना हि बाब लक्षात आल्या नंतर सदर कुटुंबाला अन्नधान्याची मदत करण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकान व केराेसीन विक्रेता एसोसिएशन तालुका पाेंभूर्णा चे कवडूजी कुंदावार यांच्याशी संपर्क करून त्यांच्या एसोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पाच किलाे तांदूळ व पाच किलाे गहू दहा कुटुंबाला देण्यात आले.

Post a Comment

0 Comments