जाणून घेऊया ! गृह विलगीकरण व या कक्षासाठीच्या मार्गदर्शक सूचना

जाणून घेऊया ! गृह विलगीकरण 
व या कक्षासाठीच्या मार्गदर्शक सूचना


कोरोना विषाणुचे संशयीत रुग्ण परदेश दौ-यावरून तसेच इतर बाहेरील बाधित जिल्ह्यामधून आले आहेत. अशा रुग्णांना होम कॉरेन्टाईन (गृह विलगीकरण) करण्यात आले आहे. विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये 14 दिवसांसाठी  सूचनांचे पालन आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये पालन करणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 2 ते 14 दिवसांचा आहे. काहींमध्ये  ही लक्षणे लवकर दिसतात तर काहींमध्ये अगदी 14 व्या ,पंधराव्या दिवशी दिसायला लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींना इतरांपासून आणि कुटुंबीयांपासून 14 दिवस दूर ठेवणे आवश्यक असते.जेणे करून यांना लक्षणे आढळलीच तर ते इतरांच्या संपर्कात येऊन त्यांना बाधित करणार नाहीत. त्यासाठी त्यांनी 14 दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. त्यांचा संपर्क कुटूंबियासोबतच इतरांशी होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने गृह विलगीकरणातील व्यक्तीं, आणि कुटुबियांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

बघूया घरातील विलगीकरण कक्षाच्या मार्गदर्शक सूचना:

प्रवासाशी संबधित असलेली किंवा नसलेली नोव्हेल कोरोना विषाणू (कोविड-19) चा संशयीत रूग्ण सापडल्यानंतर त्याचे नियुक्त केलेल्या आरोग्य केंद्रामध्ये विलगीकरण करण्यात यावे. रुग्णाच्या सर्व निकट सहवासीतांची लाईन लिस्ट बनवण्यात यावी. घराच्या स्तरावरील विलगीकरण संशयीत किंवा दुषीत रुग्णाच्या सहवासात आलेल्या सर्व सहवासीतांना लागु होईल.
हि उपाययोजना भारतामध्ये सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच प्रवासाशी संबंधीत रुग्ण,प्रवासाशी संबंधीत अथवा संबंध नसलेल्या रुग्णापासून तयार झालेला समुह जेथे क्लस्टर कंटेनमेंट धारण लागु आहे,कोविड-19 प्रभावीत भाग जेथे स्थानिक आणि समुदायामध्ये रोगाचा प्रसार होत आहे. यावेळी लागू होईल.

संपर्काची व्याख्या:

संपर्काची व्याख्या म्हणजे असा निरोगी व्यक्ती जो जंतुसंसर्ग व्यक्तीच्या किंवा दुषीत वातावरणाच्या संपर्कात येतो. आणि त्यामुळे त्याला जंतुसंसर्गाचा धोका अधिक वाढतो.

कोविड-19 च्या संदर्भामध्ये सहवासीत म्हणजे:

कोविड-19 ग्रस्त रुग्णाच्या बरोबर एकाच घरात राहणारी व्यक्ती,कोविड-19 ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या संसर्गजन्य शारीरीक स्त्रावांशी कोणतेही वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) न वापरता संपर्कात आलेली व्यक्ती,कोविड-19 ग्रस्त रुग्णाशी बंदिस्त वातावरणात संपर्कात आलेली व्यक्ती, समोरासमोर संपर्कात आलेला व्यक्ती, 1 मिटर अंतरामध्ये संपर्कात आलेला व्यक्ती (विमानप्रवासात देखील समावेश) या सहवासीतांचा समावेश होतो.


घरात विलगीकरण कक्ष करण्याची सुचना :


घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडासबाथरूम जोडलेले आहे.अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असेल तर त्यांनी रुग्णापासून कमीत कमी 1 मिटर अंतरावर रहावे.अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये,अशा व्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा,अशा व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत सामाजीक किंवा धार्मीक कार्यक्रम जसे की लग्न,अंत्यसंस्कार इत्यादी ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे.

आरोग्याच्या दृष्टीने खालील सूचना पाळाव्यात:

अशा व्यक्तीने अल्कोहल युक्त हँड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याणे वारंवार व्यवस्थित हात धुवावेत,अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये,अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा.मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत,अशा व्यक्ती,त्यांची शुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने,निकट सहवासीतांनी घरातील सुश्रृषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी, वापरलेले मास्क हा जंतू संसर्गयुक्त समजावा,अशा व्यक्तींना जर खोकला,ताप, श्वसनाचा त्रास,धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास 
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर 07172-270669,जिल्हा परिषद,चंद्रपूर 07172-253275261226,महानगरपालिका, चंद्रपूर 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.

घरी विलगीकरण केलेल्या कोरोना ग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकासाठी सूचना :

शक्यतो एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी,अशा व्यक्तींच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्यांचे वापरलेले कपडे झटकु नये,घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हातळतांना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा, डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, नातेवाईक आणि अभ्यागतांना अशा व्यक्तींनी भेटू देऊ नये,घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोविड-19 लक्षणे आढळुन आली तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे व पुढील 14 दिवस किंवा अशा व्यक्तीचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.

घराच्या स्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता :

घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमधील वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तुंचे (फर्नीचर, बेड फ्रेम, टेबल) 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जतुकीकरण करावे,शौचालयाची स्वच्छता आणि निर्जतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा घरगुती फिनायलने करावे, अशा व्यक्तींचे संपर्कात आलेले कपडे अंथरूण,पांघरूण हे घरातील डिटर्जंट वापरून वेगळे स्वच्छ धुऊन वाळवावे.

घराच्या स्तरावर विलगीकरणाचा कालावधी:

कोविड-19 ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी घराच्या स्तरावरील विलगीकरणाचा कालावधी 14 दिवस असेल किंवा संशयीत रुग्णाचे (जो की इंडेक्स केसच्या संपर्कात आलेला आहे) लॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा कालावधी कमी असेल.

अशा पद्धतीच्या घरातील विलगीकरण कक्षाच्या मार्गदर्शक सूचना पाडल्या तर कोरोना विषाणूपासून आपला बचाव नक्कीच करू शकतो.

प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments