विविध समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणा सक्रीय! अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास संपर्क साधा!


राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेला पुन्हा सुरू करण्यात आले असून यावेळी नागरिकांना शिवभोजन केंद्रात जेवण मिळणार नाही तर महानगर पालिके मार्फत या पार्सलचे वितरण होणार आहे. शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या              07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments