चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनी यानिमीत्ताने बेशिस्त पोलिसांना इशारा देण्याची गरज ! Chandrapur Police Superintendent needs to warn unruly police officers!



चंद्रपूर (बि. प्रति.)

नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात एका कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वागण्याची सोशल माध्यमांवर चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सन्मानाने व संवेदनशिलतेने वागण्याचा इशारा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना दिला आहे.

चंद्रपुर चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील कर्मचारी- अधिकाऱ्यांनाही अश्या प्रकारचा सक्तीचा इशारा देणे गरजेचे आहे. पोलिस स्टेशनमध्ये जाणाऱ्या नागरिकांशी पोलिस कर्मचाऱ्यांकडून अपमानजनक वागणुक दिल्या जात असल्याचे अनेकदा बघायला मिळते. महत्वाचे म्हणजे या प्रकरणाचा व्हिडीओ करण्यास व तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. प्रत्येक पो.स्टे. मध्ये स्टेशन डायरीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना या संबंधित सक्तिची ताकीद पोलिस अधिक्षकांनी द्यायला हवी तसेच पोलिस स्टेशन मध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा अपराधी किंवा गुन्हेगार असतोच असे नसते, याची कल्पना पोलिसांना असतेच परंतु काही पोलिसांचे वागणे सर्वसामान्य नागरिकांसोबत अत्यंत अपमानजनक असते. त्यामुळे नागरिक तर दुखावले जातातचं परंतु विभागाबद्दल ची त्यांची प्रतिमा ही मलिन होते.

अधिकारी नम्रपणे वागतात परंतु पोलिस कर्मचाऱ्यांचे वागणे हे फार उर्मटपणाचे असते असे तक्रारी अनेकदा नागरिक सामाजिक कार्यकर्ते  व पत्रकारांकडे करीत असतात., सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना याचा अनेकदा प्रत्यक्षरित्या अनुभव पोलीस स्टेशन मध्ये येत असतो.  सध्याचे पोलीस अधीक्षक प्रत्येकाचे म्हणणे नम्रपणे ऐकतात, व त्यावर मार्ग काढतात याउलट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बाबतीत बघायला मिळते या गंभीर बाबीची दखल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नक्कीच घेतील यात तिळमात्र शंका नाही.  कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षकांनी या बाबीची गंभीर दखल घेवून पोलिसांना नम्रतेचे धडे द्यावे, हे यानिमीत्ताने सांगावेसे वाटते.


बातमी वाचण्यासाठी click करा......

उच्चशिक्षीत, डिप्लोमा डिग्रीधारकांसोबत अल्पशिक्षीत नगरसेवक ही मनपात !

जिल्हाधिकारी कार्यालयात 'शासकीय कामासाठी गेलेल्या महिलेसोबत बाद' तसेच 'कर्मचा-याची महिलेशी अरेरावी करतांना चा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला त्याची जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्त खुलाशाच्या आधारे आवश्यकतेनुसार पुढील योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्याअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागणे, ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा अनुचित वर्तन सहन केले जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

याप्रकरणी भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना संयम, शिष्टाचार व प्रशासनाची प्रतिमा लक्षात ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही नागरिकास जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयात काही तक्रार असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याऐवजी थेट कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार नोंदविण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगड़ कुंभार यांनी स्पष्ट केले आहे. हीच तत्परता पोलिस प्रशासनाने दाखवित कर्मचारी-अधिकाऱ्यांना येणाऱ्यांशी सौजन्याने वागण्याचा इशारा द्यायला हवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या