उच्चशिक्षीत, डिप्लोमा डिग्रीधारकांसोबत अल्पशिक्षीत नगरसेवक ही मनपात एन्ट्री ! Highly educated, diploma degree holders along with low-educated corporators enter the municipality!



चंद्रपूर (वि. प्रति.)

१६जानेवारी २०२६ रोजी चार वर्षानंतर पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेचा निकाल लागला. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी आश्चर्याचा धक्का देत भाजप ने संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या रूपाने आपला महापौर बसवला तर मित्र पक्ष असलेल्या उबाठा गटातील अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांच्या रूपाने उपमहापौर मनपा ला मिळाला. ६६ नगरसेवक असलेल्या मनपा मध्ये बहुमतासाठी ३४ जादुई आकडा पार करायचा होता. परंतु भाजपने आश्चर्याचा धक्का देत ३२ मते घेत महापौर विराजमान केले. यात उबाठा सोबत असलेल्या वंचित च्या दोन नगरसेवकांनी गैरहजर राहत व एमआयएम च्या एका उमेदवाराने तटस्टथ रहात भाजपला सत्तेत स्थान आणले. विशेष बाब म्हणजे मनपाचे महापौर व उपमहापौर हे दोन ही विठ्ठल मंदिर वार्डातील आहे.

नगरसेवकांनी दाखल केलेल्या शपथपत्रामधील अनुसूची-१ प्रमाणे चंद्रपूर मनपाच्या ६६ नगरसेवकांमध्ये उच्चशिक्षीत, डिप्लोमा- डिग्री धारकांसोबत, बारावी पास नापास तर अल्पशिक्षण घेतलेले नगरसेवक ही महानगर पालिकेत नागरिकांनी निवडुन पाठविले आहे. तर यातील १६ नगरसेवक - नगरसेविकांवर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.

महापौर पदी विजयी झालेल्या संगीता राजेंद्र खांडेकर यांचे शिक्षण दहावी नापास असुन यापुर्वी त्यांना नगरसेवक म्हणुन नागरिकांनी निवडुन पाठविले होते. यापुर्वी त्यांनी मनपाचे झोन सभापती ही पद भुषविले आहे. उपमहापौर पदी अपक्ष म्हणुन निवडून आलेले प्रशांत आनंदराव दानव यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे. मृदु स्वभावाचे प्रशांत दानव यापुर्वी काँग्रेसच्या उमेदवारी निवडुन आले होते. त्यांना मनपा कारभाराचा अनुभव आहे.

चंद्रपूरच्या पराभूत उमेदवारांना हे कां बरे सुचत नाही...!

काँग्रेस चे राहुल अरूण घोटेकर एम.ए. इकॉनॉमी, सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले एम. ए., (राज्यशास्त्र, इंग्रजी), बि.एड., शेकाप चे प्रदिप (पप्पु) शंकर देशमुख बि.ई. मेकॅनिकल इंजिनिअर भाजपचे सुभाष दिनकरराव कासनगोट्टूवार पॉलिटेक्नीक, भाजपच्या सारीका सचिन संदुरकर एम. ए., एल. एल. बी., उबाठा चे (गटनेते) राहुल बबनराव विरूटकर बि.कॉम, काँग्रेसच्या वनश्री केशव मेश्राम एम.ए., एम.एड., अजय निळकंठराव बल्की डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, भाजपचे प्रज्वलंत प्रमोद कडू एम.ए. राज्यशास्त्र, काँग्रेसच्या अनिता हनुमान चौखे बि.ए. समाजशास्त्र, डि.टी. एड. झालेल्या आहेत. काँग्रेसचे गटनेते राजेश मुरलीधर अड्डर डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरींग पर्यंत शिक्षण घेतले आहे. तर काही नगरसेवकांनी दहावी-बारावी पास-नापासपर्यंत शिक्षण घेतले असल्याचे सादर केलेल्या शपथपत्रामधून निदर्शनास येते.



विशेष बाब म्हणजे तिनदा नगर परिषद आणि दोनदा महानगर पालिकेमध्ये असे एकंदर पाचदा नगरसेवक म्हणुन निवडून आलेले व मनपा- नप प्रशासनात अनेक मोठी पदे भुषविलेले व मनपा प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले वसंत देशमुख यांनी जनसेवेचा ध्यास व विकास कार्याचे सातत्य टिकवून ठेवतांना जनतेचे कार्य करण्यात अल्प शिक्षण कधीही बाध्य ठरू शकत नाही, हेच सिद्ध केले. त्यांचे शिक्षण फक्त चवथीपर्यंत झालेले असुन आत्ताच्या महानगर पालिकेमध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला तो त्यांच्या जनहित कार्यामुळे व जनतेसाठी नेहमी तत्पर राहण्याच्या वृत्तीमुळे असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. विरोधी किती ही बलाढ्य राहिला तरी त्याला मात देत त्यांनी आत्तापावेतो आपल्या विजयाचा विक्रम मनपामध्ये नोंदविला आहे. त्यांची ही कर्तबगारी बघता काँग्रेस पक्ष त्यांच्यावर मनपामध्ये मोठी जबाबदारी अवश्य देतील, यात दुमत नाही.


साप्ता . विदर्भ आठवडी चा नियमित अंक वाचकासाठी.... 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या