10 ला होणार चंद्रपूर मनपा ची महापौर व उपमहापौर पदाची निवड ! Chandrapur Municipal Corporation to hold election for Mayor and Deputy Mayor on February 10!

 


चंद्रपूर,  : महानगर चंद्रपूर चा निकाल लागून आज १० दिवसांचा कार्यकाळ उलटला असून काँग्रेस ला २७ तर बीजेपी ला २३ जागा मिळाल्या असून दोन्ही मोठे पक्ष बहुमत घेऊ शकले नाही त्यामुळे शिवसेना (उबाठा )+वंचित व अपक्षांना घेऊनच सत्ता स्थापन होऊ शकते. भाजप आणि काँग्रेस आपलीच सत्ता बसावी यासाठी प्रसारात असून १० ला कोण महापौर व उपमहापौर याची कोडी सुटणार आहे. 


चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे.

चंद्रपूरच्या पराभूत उमेदवारांना हे कां बरे सुचत नाही...!

महानगरपालिका आयुक्त यांनी महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता विशेष सभेचा दिनांक व वेळ निश्चित करून मिळण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना विनंती केली होती. सदर पदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे.

त्यानुसार आज मंगळवार दि. 27 रोजी  दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता राणी हिराई सभागृह, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्यातर्फे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निर्गमित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या