चंद्रपूर (वि. प्रति.) : नुकतीच एका प्रादेशिक वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली आणि चंद्रपुरच्या पराभुत उमेदवारांना 'हे कां बरे सुचनत नाही ?' असा प्रश्न यानिमीत्ताने उभा ठाकला.
नागपुरातील एका प्रभाग मधील चार ही भाजपचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडुन आले, त्यानंतर ही भाजपच्या पराभूत उमेदवारांनी एक अनोखा उपक्रम सुरू करून नागरिकांच्या घरी जावून भेटी घेणे, थेट संवाद साधणे, सुचना, अपेक्षा जागुन घेण्याच्या उद्देशाने 'जनतेच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला असल्याची बातमी वाचण्यात आली.
चंद्रपुरामध्ये ६६ जागांसाठी ४५१ रिंगणात होते. त्यात भाजप-काँग्रेस सोबत अन्य जणांना मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला. ३८५ उमेदवारांना या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यात सगळ्यात जास्त पराभूत उमेदवार हे काँग्रेस-भाजप या मोठ्या पक्षाचे आहेत. चांगल्या चांगल्या दिग्गजांना या निवडणुकीत मतदारांनी पराभवाची धुळ चाखवली आहे. 'निवडणुक जिंकलो वा हरलो तरी लोकसेवा हीच खरी जबाबदारी आहे.' असा संदेश 'जनतेच्या दारी' या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जात आहे. आम्ही हरलो तरी आपल्या सेवेसाठी तत्पर होतो व आहो. हा संदेश देण्याचा प्रयत्न चंद्रपुरातील पराभूत उमेदवार कां बरे करीत नाही. आता हरले तरी पुढल्या खेपेला याच मतदारांसमोर त्यांना जायचे आहे. पराभवाचे मंथन करताना कां हरलो ? हि चूक पराभूत उमेदवारांना बहुतेक दिसत असेल त्याच कारणाने तो पुन्हा निवडणूक लढतो. अगदी कालपर्यंत मतदारांचे हात-पाय जोडणारा मात्र पराभवानंतर लगेच नागरिकांशी संबंध तोडताना बघायला मिळते.
पराभूत झाले तरी समाजसेवकांकडून नागरिकांना बारा महिने अपेक्षा असतात. 'गधे के सिर से सिंग गायब प्रमाणे आता उमेदवार गायब झाले आहेत. काही उमेदवार फक्त सोशल माध्यमांद्वारे पोस्टर बॅनरद्वारे मतदारांचे आभार मानून काही मोकळे झालेतर काहींनी असे करणे सुद्धा टाळले यात काही जण तर मतदारांना शिव्या हासडत पानटपऱ्यांवर, सार्वजनिक स्थळांवर झालेल्या खर्चाचा केलेल्या कामांचा हिशोब देत बसले आहे. त्यापेक्षा पराभवानंतर ही नागरिकांशी संपर्क करून परस्पर आभार मागण्याचे त्यांना कां बरे सुचले / सुचत नसेल. 'जनतेच्या दारी' सारखा एखादा अभिनव उपक्रम राबविण्याची संकल्पना चंद्रपुरातील पराभूत उमेदवारांना कां बरे येत नाही, हे कळायला मार्ग नाही.
निवडुन आल्यावर समाजसेवा करण्याचा "वेडा ध्यास" पराभूत उमेदवारांना पुढच्या खेपेला तर नक्कीच निवडून येऊ असे महंत मतदारांना मात्र आता विसरला आहे. "ये पब्लिक है सब जानती है" हे सुद्धा तो आता विसरला आहे. पुढल्या वेळेला चुका सुधारू, जोमाने कमला लागू असे म्हणत स्वतःला पुचाकरण्यापेक्षा पराभवानंतर ही जनतेच्या संपर्कात राहण्याची बुद्धी कां बरे येत नाही. ईश्वर त्यांना अशी सद्बुद्धी प्रदान करो, हीच या निमीत्ताने अपेक्षा !
चंद्रपूरातील २० हजाराच्या जवळपास मतदारांनी 'आम्हाला यापैकी एक ही उमेदवार नको !' असे दर्शवत 'नोटा' वर मतदान केले, याची विजयी-पराभूत उमेदवारांना यानिमीत्ताने आठवण करून द्यावीसी वाटते.

0 टिप्पण्या