बल्लारपूर : सध्या कोरोना विषाणूचा सामना सर्व जगालाच करावा लागत आहे.अश्यातच बल्लारपूर वनपरिक्षेत्रात सोशल डिस्टस्टींग ठेऊन कळमना, बामणी, दहेली, केम, कोर्टी, लावणारी, कवडजई, उमरी, सातारा भोसले, सातारा कोमटी या गावातील मजूरांना रोजगारासाठी तेंदुपाने संकलन करणे वरदान ठरले आहे. तेंदूपान संकलन प्रती शेकडा तेंदुपुड्या करीता २२० रुपये मंजूर असून गावकरी संकलन करीत असून शासनाच्या दिशा-निर्देशाचे पूर्ण पालन करून मजुरांच्या उदरनिर्वाह यातून होत आहे.
शासनाने वेळोवळी दिलेल्या अटीशर्ती व आदेशाचे पालन करावे, दर २० मिनीटाला आपले हातपाय जंतूनाशकाने स्वच्छ धुवावेत, शिंकतांना खोकलतांना, जंगलात व पळीवर जातांना तोडावर रूमाल मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तीमध्ये कमीतकमी सुरक्षित २मिटर अंतर ठेवावे,तेंदुपान संकलन फळीवर उभे राहताना सुरक्षीत अंतर ठेवावे फळीवर गर्दी करू नये,पळीवर आल्यावरकिवा घरी गेल्यावर साबण किंवा जंतुनाशकाने हात पाय धुवावेत,तेंदुपान संकलन करण्यासाठी सुर्योदयनंतर जंगलात समुहाने जावे एकटे जावु नये, जंगलात जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या भागात जावु नये, कोणत्याही झाडांचे अवैध वृक्षतोड करून नये, वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य योग्यरित्या पार पाडल्या जात असल्याची माहिती बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या