रेती माफिया "वासुदेव" वर भद्रावती पो.स्टे. मध्ये रेती चोरीचा गुन्हा दाखल !


  • प्रत्यक्ष रेती साठ्याच्या पाहणीनंतर वरोरा चे SDM शिंदे व sdpo पांडे यांनी केली कारवाई!
  • वृत्तमालिकांनी केले रेती चोरीचे मोठे घबाड उघडकीस !
  • उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या प्रामाणिक धाडसी कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले.
  • उर्वरित रेती साठ्यावर कारवाई करण्याचे शिंदे यांचा इशारा.
  • भुमिपूत्राची हाक पोर्ट़लने केला पाठपूरावा, प्रकरण आणले चव्हाट्यावर!
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून तो अज्ञात ठिकाणी लपवायचा आणि तो जमा करून विकण्याच्या मोठा व्यवसाय अनेक रेती माफिया करीत आहे. त्यातीलच वासुदेव नामक एका रेती माफिया चे रेती चोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आले असून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या धाडसी कारवाईमुळे अखेर रेती माफिया वासुदेव याच्यावर भद्रावती पोलीस स्टेशन येथे दिनांक १३ मे ला अपराध क्रमांक २४६/२० भांदवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महत्वाचे म्हणजे वृत्ताच्या आधारावर चालविलेल्या वृत्त मालिकेतुन हे रेती चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले. आतापावेतो मिळालेल्या रेती साठ्याची उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांच्यासोबत प्रत्यक्ष रेती साठ्याची पाहणी करून "तोंडात बोटे घालावा" असा या रेतीच्या जखिऱ्यावर कारवाई केली. अधिकारी प्रामाणिक राहिले तर कोणताही गुन्हा एकाएकी घडत नाही, असे म्हणतात ते खरेच आहे. तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय चोऱ्या होऊ शकत नाही, हेही तेवढेच खरे आहे.
कारवाईने पिसाळलेल्या "वासुदेव" च्या नातेवाईकाच्या पत्रकारांना "पाहून घेण्याच्या" धमक्या!
"वासुदेव" च्या रेती साठ्यावर कारवाई झाल्यानंतर रेती माफिया "वासुदेव"चा पिसाळलेला नातेवाईक पत्रकारांना मात्र पाहून घेण्याच्या धमक्या देत मोकाट हुंदळत आहे. "मंगल (पत्रकार) का खून कोई, लेमन सोडा नाही" हे आता या पिसाळलेल्या नातेवाईकाला आता वेगळे सांगण्याची गरज नाही. "हरामाच्या आणि चोरी" च्या पैशाचा माज असतो परंतु मगरूरी नको, कारण ती जमीन दाखवते. हे पिसाळलेल्याना कुणीतरी सांगा हो ! अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, रेती माफिया वासुदेव यांनी भद्रावतीच नव्हे तर जवळच्या वणी क्षेत्रात सुद्धा चोरीच्या रेतीचा काळा धंदा जोमात चालवून आपले एकछत्री राज्य चालवीलेले होते. वासुदेव यांनी तहसीलदार शितोळे यांच्यासोबत मिळून राष्ट्रीय संपत्तीची चोरी मोठ्या प्रमाणात करतांना छोटे ट्रक्टर चालक-मालक यांच्या धंद्यावर मोठा परिणाम केला होता, नव्हे त्यांना देशोधडीला लावले होते. त्यामुळेच भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून वासुदेव यांचा तहसीलदार यांच्यासोबत च्या छुप्या समझोता करार समोर आणण्यासाठी बातम्यांची मालिका सुरू केली होती व विस्तार पूर्वक सगळी माहीती समोर आणली होती. त्याच आधारे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी एक प्लान तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांना सोबत घेवून वासुदेव ठाकरे यांचे सर्व रेती साठे शोधून काढले आणि शेवटी वासुदेव ठाकरे यांच्यावर तहसीलदार शितोळे यांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला. अर्थात ही भुमोपुत्राची हाक न्यूज पोर्टल ची मोठी उपलब्धी असून स्वतः उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी याबद्दल भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल टीमचे आभार मानले आहे .

आता या रेती चोरी प्रकरणाचे दूरगामी परिणाम हे भद्रावती तालुक्यात होणार असून केवळ मीच मालक आणि मीच रेती चोरी केली पाहिजे माझ्यासमोर कुणीही स्पर्धा करायला नको अशा आविर्भावात वावरणाऱ्या वासुदेव सारख्या रेती माफियाच्या दुकानदाऱ्या आता बंद होणार आहे. यानंतर वाघ आणि कर्नाटका एम्टा कोळसा कोणते वळण घेणार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments