गडचांदूर न.प. च्या "मुजोर" सि.ओ डॉ. विशाखा शेळकी यांचा "बिनकामाचा" ऊहापोह!

"काम" कमी "गोंधळ" जास्त !


गडचांदूर (वि.प्र.) : गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी अनेक वादातीत विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकतेच एका सुज्ञ नागरिकाच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे त्या किती "मुजोर" आहेत याची प्रचिती येते. यापूर्वी विदर्भ आठवडीचे संपादकांना सुद्धा सुगंधित तंबाखू वर केलेली माहिती देण्यापेक्षा आपल्या विद्वत्तेचे ज्ञान पाझरवलं होतं. "काम" कमी आणि "गोंधळ" जास्त अशी या मॅडमची स्थिती आहे. गडचांदूर शहराचे प्रतिष्ठित नागरिक, भिम आर्मी संघटनेचे जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांनी संचारबंदी मध्ये महत्त्वाची सूचना देण्यासाठी जबाबदार अधिकारी म्हणून शेळकी मॅडम ला फोन केला. त्यावर समाधानकारक उत्तर न देता धमकीवजा दिलेली चेतावणी ही डॉ. विशाखा शेळकी यांची अधिकारी होण्याची "मग्रुरी" यामधून स्पष्ट करित आहे. अधिकाऱ्यांना बहुतेक सामान्य व्यक्ती फार कमी फोन करून सूचना देत असतात. एखादाचं जागरूक नागरिक अशा पद्धतीचे सुज्ञ पाऊल उचलतो. गडचांदूर येथील रहिवासी असलेले मदन बोरकर यांनी संचारबंदी दरम्यान सोशल डिस्टन्सिगचे पालन न होत असलेले बघून त्यांच्या क्षेत्रामध्ये गडचांदूर न. प. कर्मचाऱ्यांसोबत गडचांदूर चे काही प्रतिष्ठीत व्यक्ती गडचांदूर मधील प्रशासकीय ठिकाणी पार्टी करत असल्याची जागरूक नागरिक या नात्याने सूचना दिली परंतु या सूचनेला गांभीर्याने न घेता बोरकर यांना अत्यंत खालच्या दर्जात "फक्त सापडा तुम्ही, मग सांगते कोणते राहते सोशल डिस्टन्सिग" या शब्दात खडे बोल सुनावले. एवढेच नाही तर "तुमच्या घरी किती सदस्य आहेत?" इथपासूनची उलटतपासणी केली. डॉ. शेळकी मॅडम या गडचांदूर न. प. च्या मुख्याधिकारी आहेत, सीबीआय अधिकारी नाहीत हे त्यांनी सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. एखादा जागरूक व्यक्ती त्यांना फोन करून जर काही माहिती देत असेल तर तो अपराध करत नाही याचे पण भान त्यांनी ठेवायला हवे. यापूर्वीही अशा अनेक घटना गडचांदूर मध्ये मॅडम संदर्भात घडल्या आहेत. 4 मे रोजी गडचांदूर मध्ये सुगंधित तंबाखू वर कारवाई करण्यात आली. या कारवाई संदर्भात माहिती मिळावी यासाठी विदर्भ आठवडी चे संपादकांनी फोन करून माहिती विचारली असता अद्यापपावतो ती माहिती प्राप्त करून देण्याचे पारदर्शक काम या मुख्याधिकाऱ्यांकडून झालेले नाही. काही पत्रकारांना यासंदर्भात सांगतांना असा कोणताच फोन किंवा कोणतीच माहिती मला विचारण्यात आली नाही. केलेली कारवाई ही "रूटींग कारवाई" चा भाग होता. सुगंधीत तंबाखूवर कारवाई करून तो जाळला जात असतो, या पद्धतीचे खोटे व निराधार उत्तरे स्थानिक पत्रकारांना देऊन त्यांनी स्वतःच्या कर्तव्याबद्दल त्या किती जागरूक आहेत, याची जाणीव करून दिली. अवघ्या 40 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेले गडचांदूर शहर, "माशी शिंकली तरी ती कशामुळे शिंकली" याची चर्चा गडचांदुर मध्ये होते. सुगंधित तंबाखू वर केलेली कारवाई ही पाच हजाराची असेल तरी ती चोरीच आहे याची जान अधिकाऱ्यांना असायला हवी. आणि विचारणा होत असेल तर ती माहिती त्वरित सार्वजनिक व्हायला हवी. परंतु वरील प्रकरणात तसे न होता फक्त उडवाउडवीची उत्तरे खोट्या माहिती या आधारावर आपले "गौडबंगाल" लपविण्याचा चाललेला कारभार गडचांदूर मध्ये चर्चेचा विषय आहे. भीम आर्मी संघटनेचे जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांनी चंद्रपूर चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी महोदय यांना यासंदर्भात तक्रार दिली असून यावर काय होते याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.
बालवयात असलेल्या गडचांदूर नगरपरिषद मध्ये पूर्णवेळ अधिकारी म्हणून लाभलेल्या डॉक्टर विशाखा शेळके या एकमेव अधिकारी आहेत, यापूर्वी अधिकारी आले आणि गेलेत. पूर्णवेळ आणि ती पण महिला अधिकारी ही गडचांदूर न.प. मध्ये डॉ. विशाखा शेळकी यांच्या रूपाने लाभलेल्या पहिल्या अधिकारी आहेत, त्यामुळे गडचांदूरकरांना या मॅडम पासून फार अपेक्षा होत्या परंतु अपेक्षेच्या विपरीत गडचांदूर मध्ये होत आहे. गडचांदुर न.प. मधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून "हम सर हम करे सो कायदा" असं मॅडम चा सूरू असलेला कारभार "चिंतना"चा विषय आहे. गडचांदुर न.प. मध्ये जवळपास 27 पूर्णवेळ कर्मचारी तर 70 च्या आसपास "टेम्परवरी बेस" वर काम करणारे कर्मचारी आहेत. यापूर्वी विविध भ्रष्टाचाराच्या आरोपात लटकलेले कर्मचारी मुख्याधिकारी मॅडमच्या जवळपास कां बरे राहतात, हा ही तेवढाच संशोधनाचा विषय आहे.

(या बातमी सोबत खालील पोस्ट मध्ये भिम आर्मी चे जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर यांचेशी उद्धट बोलण्याचा तो "audio" व सोबत "त्या" युवकाचा "video")



"न.प." प्रशासनाचे वाभाडे काढणारा तो"व्हिडीओ!"

संचारबंदी नंतर त्या-त्या गावातील व्यक्तींना आपापल्या गावी नि:शुल्क सोडण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने 10 में रोजी जाहीर केले. गडचांदुर येथून बिहार येथे जाणाऱ्या एका युवकाचा गडचांदुर न.प. प्रशासनाने त्याच्याकडून रक्कम घेऊन त्याला सोडण्यात आल्याच्या एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे मध्ये बसलेला हा युवक त्याच्यासोबत असलेल्या अन्य लोकांच्या सुद्धा मुलाखती घेऊन त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले नाही मग आपल्याकडून गडचांदूर न.प.प्रशासनाने पैसे कां बरं घेण्यात आले जर ते चुकीने घेण्यात आले तर ते वापस करावे? अशा आशयाची ही पोस्ट अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे. गडचांदूर मधील हा युवक असल्याची माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे 10 मे रोजी राज्य शासनाने अध्यादेश काढून कोणाकडूनही पैसे न घेता नि:शुल्क त्यांना सोडण्यात यावे असे जाहीर केले होते. 11 मे रोजी हा युवक गडचांदूर येथून बिहार येथे जाण्यासाठी रवाना झाला व त्याचे कडून रक्कम वसूल करण्यात आली. गडचांदुर न.प. प्रशासनाचे वाभाडे काढणारा या व्हिडीओतील सत्य न.प. प्रशासनाने मीडियासमोर उघड करायला हवे.

Post a Comment

0 Comments