आज "चंद्रपूर" ची बाजारपेठ नियमांच्या बंधनात खुलली!चंद्रपूर : आज जवळपास चाळीस दिवसानंतर चंद्रपूरातील बाजारपेठा नियमांच्या बंधनात राहून खुल्या करण्यात आल्या एका अर्थाने चंद्रपूरच्या "मार्केट"ला जुने स्वरूप आले होते. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी सात ते दोन पर्यंत जीवनावश्यक वस्तू व दहा ते दोन पर्यंत अन्य वस्तूंची दुकाने उघडी करण्याची मुभा दिली होती. परंतु नियमाचे बंधन पाळण्यात यावे अशी विनंती ही त्यांनी केली होती. जिल्ह्यातून खुल्या झालेल्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गरजेच्या वस्तू खरेदीसाठी हजेरी लावली. नियमांचे पालन करूनच या सगळ्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या व ग्राहकही याकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसले. चेहऱ्यावर मास्क घालूनच प्रत्येक जण आज खरेदीसाठी आला होता. कोरोना च्या पार्श्वभुमीवर लागलेल्या संचारबंदी नंतर जवळपास चाळीस दिवसांच्या पेक्षा जास्त काळ चंद्रपूरकरांनी शहरातील बाजार बघितला नव्हता. आज विविध वस्तूंच्या खरेदीसाठी चंद्रपूर करांनी बाजारात प्रवेश केला, दुकानदारांनीही सोशल डिस्टन्स सिंग चे पालन करण्यासाठी मार्किंग करून ठेवल्या होत्या बरोबर दोन वाजता आपले दुकान बंद करण्याच्या नियमाचे त्यांनीही पालन केल्याचे आज दिसले.जिल्ह्यातील एकमेव रूग्णांची
प्रकृती स्थिर, सर्व नमुने निगेटिव्ह!

चंद्रपूर, दि. 11 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कातील परिवारासह आतापर्यंत घेण्यात आलेल्या 59 स्वॅब नमुन्यांपैकी सर्व 59 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूर रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज दुपारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 59 नागरिकांपैकी सर्व 59 अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. दरम्यान आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 95 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिका, आरोग्य विभागाच्या 47 चमू कार्यरत आहे. यांनी 11 मे रोजी या प्रतिबंधित क्षेत्रातील 2 हजार 152 घरांमध्ये राहणाऱ्या 8 हजार 540 नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अतिगंभीर श्वसनाचा आजार असणारे 11 रुग्ण संशयित होते. मात्र त्यांचा देखील यासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील ताजी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत 220 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यापैकी कृष्ण नगर येथील रुग्णांचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 195 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या पैकी आता 24 अहवाल प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यामध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रांमध्ये संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले 121, तालुका स्तरावर संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले 123 तर एकूण रूग्ण संख्या 244 आहे.
जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत गृह अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या 54 हजार 234 आहे. यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक 46 हजार 259, महानगरपालिका क्षेत्रात 3321 तर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये 4 हजार 654 व्यक्तींना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. सध्या 15 हजार 123 नागरिक गृह अलगीकरणात आहेत.

Post a Comment

0 Comments