अवैधरित्या वाळु वाहतुक प्रकरणी ट्रक्टर जप्ती!



  • वनपरिक्षेत्र बल्लारपूर यांची कारवाई!

बल्लारपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र कळमना मधील लावारी-1 बिटातील कक्ष क्र. 515 मध्ये दिनांक 31/05/2020 ला पहाटे 04.00 वा. अवैधरित्या खोदकाम करुन वाळुची वाहतुक करतांना नामे मनोज लल्लुमनी प्रसाद रा. ऐडसी यांच्या मालकीच्या स्वराज 735 PF, निळा रंग, ट्रक्टर क्र. MH 34 AP 2356, ट्रॉली क्र. MH 34 F 3284 ट्रक्टर वाहन जप्तीची कार्यवाही करुन प्राथमिक गुन्हा क्र. 8/15 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 26 (1) ग अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपी नामे 1. रुपेश भोलानाथ कोडापे रा. केम, 2. मारोती गजानन मडावी रा. केम, 3. शुभम संजय मडावी रा. केम, 4. मनोज लल्लुमनी प्रसाद रा. ऐडसी (ट्रॅक्टर मालक) यांना ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. संतोष थिपे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास कळमनाचे क्षेत्र सहाय्यक आकाश मल्लेलवार, लावारी-१ चे वनरक्षक एम. जी. धाईत करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या