1 ते 30 जुनपर्यंत लाॅकडाऊन, "अनलॉक-1" या नव्या स्वरूपात !



देशात रविवार लॉकडाऊन 4.0 संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 साठी नवीन गाईडलाइन जाहीर केली आहे. देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने परत एकदा देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून १ जून ते ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. देशात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. मात्र यावेळी लाॅकडाऊनचे नाव बदलून अनलाॅक १ असे करण्यात आले आहे.

शनिवारी कोरोना व्हायरस सुमारे 7900 रुग्ण आढळले होते तर एकुण संक्रमितांची संख्या 1.69 लाख पर्यंत पोहचली होती. आतापर्यंत 4900 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. दरम्यान उपचारानंतर बऱ्या होणाऱ्या बाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ झाली असून ती 81 हजारांवार पोहचली आहे. दरम्यान, सरकारनं लॉकडाऊन 5.0 हा 30 जून पर्यंत असेल असं जाहीर करून नवीन गाईडलाइन जाहीर केली आहे.
शाळा आणि कॉलेज उघडण्यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकार राज्य सरकार वर सो हॉटेल, धार्मिक स्थळ, रेस्टॉरंट 8 जून पासून उघडतील. दरम्यान, सरकारनं काही नियम आणि अटींवर त्यांना उघडण्याची परवानगी दिली आहे. देशात रात्री 9 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कप लागू राहणार आहे. नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावू शकतील.आता त्यांना पास दाखवण्याची देखील गरज नाही.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारत सरकारची मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे व राज्य अधिकारी यांना, ३० जून २०२० पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे चालू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र या लाॅकडाऊन ५ मधून मोठ्या प्रमाणावर सवलती मिळणार असल्याचे संकेत देखील मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments