हवामान बदलाच्या जागतिक कामगिरी निर्देशांकात भारत 6 व्या स्थानावर !#air chopne


प्रा.सुरेश चोपणे
अध्यक्ष-ग्रीन प्लानेट सोसायटी

      जर्मन वॉच, न्यु क्लायमेंट इन्स्टिट्युट आणि क्लायमेट ऍक्षण नेटवर्क ह्या संस्थानी 2020 सालासाठीचा जागतीक हवामान बदल निर्देशांक प्रकाशित केला असून त्यात भारताचे स्थान जगातील अनेक मोठया देशापेक्षा पुढे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ह्या अभ्यासा साठी जगातील अनेक देशांच्या 350 तज्ञांनि भाग घेतला होता, त्यात भारतातून टेरी आणि कॅन साऊथ इंडिया ह्या संस्थेच्या  सहभाग होता.अभ्यासा साठी चार  क्षेत्र निवडले गेले होते त्यात,हरित वायू उत्सर्जन, अपारंपरिक ऊर्जा,विजेचा वापर आणि हवामान बदल धोरण ह्याचा समावेश होता. ह्या चार क्षेत्रातील 14 मानकांचा निर्देशांकासाठी अभ्यास करण्यात आला, त्यात दरडोई हरीत वायू उत्सर्जन,पूर्वीचे दरडोई हरित वायू उत्सर्जन, उत्सर्जनाची सध्यस्थीती,त्यासंबंधी 2030 चे ध्येयं, आजची अपारंपरिक ऊर्जा स्थिति, ऊर्जा पुरवठा,2030 चे ध्येय, आजचा ऊर्जा वापर, देशांचे हवामान बदल धोरण , आंतरराष्ट्रीय हवामान बदल धोरण इ मुद्याना निकष मानले गेले. जगातील जि 20 देश आणि एकूण 61 देशांचा वरील विषयावर अभ्यास करून त्यांचा निर्देशांक जाहीर करण्यात आला. ह्या निकषांवर प्रथम कोणतेही 3 देश येऊ शकले नाही, परंतु पहिल्या 10 देशात भारताचा 9 वा क्रमांक लागला. अमेरिका मात्र अगदी शेवटी 61 व्या क्रमांकावर गेली हे विशेष.4)स्वीडन (75.11 स्कोर),5)डेन्मार्क(71.14), 6)मोरोक्को(70.63),7) इंग्लंड(69.80),8)लिथुनिया(66.22),9)भारत(66.2),10)फिनलँड(63.25) ह्या श्रेणीत जपान 51 ,रशिया 52,केनडा 55,ऑष्ट्रेलिया 56 तर अमेरिका ह्या श्रेणीत शेवटीं 62 व्या स्थानावर गेला आहे.
*ह्याच रिपोर्ट मध्ये G 20 देशाची रँकिंग दिली आहे* हरित वायू परिणाम क्षेत्रात जी 20 देशात 91.9 गुण घेवून दुसऱ्या स्थानावर आला आहे. इथे अनुक्रमे इंग्लंड, भारत, फ्रान्स, ब्राझील, युरोप हे पाच देश प्रथम आले आहेत. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जी 20 देशात भारत6 व्या क्रमांकावर आहे. इथे अनुक्रमे ब्राझील,तुर्की,इंग्लंड, जर्मनी, चीन,भारत प्रथम आहेत.जि 20 देशात ऊर्जा वापर क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, इथे अनुक्रमे मेक्सिको, भारत, ब्राझील, इंग्लंड, इंडोनेशिया प्रथम आहेत.  शेवटीं हवामान बदल धोरण ह्या गटात भारत 73.6 गुण घेऊन 12 व्या क्रमांकावर आहे...ह्या अहवालात भारत पहिल्या 10 देशात असल्याने भारताच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले आहे,देशासची अपारंपरिक ऊर्जा आणि हरीत वायु उत्सर्जन क्षेत्रात चांगली कामगिरी आहे,परंतु भारताला कोळश्या वरील अवलंबित्व कमी करावे असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments