मागेल त्याला शेततळे द्या !  • आ. जोरगेवार यांच्या कृषी अधिका-यांना सुचना
  • आमदार किशोर जोरगेवार पोहचले शेतक-यांच्या बांधावर, जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर : मान्सूनचे आगमत होताच शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे. दरम्यान काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाचा दौरा करत थेट शेतक-यांच्या बांधावर जावून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनियमित पाऊस आणि कोरोनामूळे शेतक-यांपूढे उभे असलेल्या आवाहणाची मला कल्पना आहे. असे सांगत शेतक-यांच्या अडचणी सोडविल्या जातील अशी ग्वाही ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. तसेच मागेल त्याला शेततळे द्या अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषिधिका-यांना दिल्यात. यावेळी तालूका कृषिधीकारी वहाते, सहायक कृषिधीकारी गायकवाड, साखवाहीच्या सरपंच छबू बोंडे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक नागेश बोंडे, ग्राम पंचायत सदस्य माया भगत, उज्वला काकडे, ग्रामसेवक देवगडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य विलास भगत, तर शेनगावच्या सरपंच निर्मला मिलमिले, कृषि सहायक अधिकारी पंकज ढेंगणे, तलाठी राहूल भोंगडे, ग्रामसेवक रविंद्र चवरे, ग्राम पंचायत सदस्य राजेश कांबळे, चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, मनोज धांडे, विठ्ठल बंडेवार, प्रभाकर धांडे, आदिंची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांनी शेतक-यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. अनियमीत पाऊस आणि आता कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी शेतकरी बांधव होडपरुन निघाला असून त्याच्यापूढे समस्यांचा डोंगर उभा आहे. असे असतांनाही नव्या जोशाने तो पून्हा शेत फुलविण्याच्या कामाला लागला आहे. यंदा दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवीली आहे. त्यामूळे शेतक-यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहे. पूरेसा पाऊस होणार असल्याने धान उत्पादन शेतक-यांना याचा लाभ होणार असाही अंदाज वर्तविला जात आहे. त्यामूळे शेतक-यांनी काळजी न करता जोमाने कामाला लागावे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सक्षम आहे. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. काल ते विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाच्या दौ-यावर होते.

     यावेळी त्यांनी शेतक-यांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी साखरवाही आणि शेनगाव येथील शेतक-यांच्या बांध्यावर जावून शेतीच्या कामाची पाहणी करत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावात महामंडळाच्या बसेच नियमीत येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. आमदार किशोर जोरगेवार यांनी लगेच तात्काळ येथील बस सेवा सुरु करण्याच्या सूचना परिवहण अधिकारी यांना दिल्यात. तसेच येथील निराधार, श्रावणबाळ व संजय गांधी योजनेचे प्रकरण निकाली काढण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी तहसिलदार यांना दिलेत. यावेळी गावातील पाटाचे नुतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थानी केली. आमदार किशोर जोरगेवार यांनीही तात्काळ सिंचाई विभागाचे अभियंता यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधन पाटाचे नूतणीकरण करण्याच्या सूचना केल्यात.   

           येथील पांदणरस्ते तयार करण्यासह शेतकर्याच्या शेत तळ्यांचे अस्थरीकरन करण्याचे आश्वासनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामस्थांना दिलेत. तसेच ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता वेकोलीच्या सी.एस.आर फंडातून साखरवाही येथील तलावाचे खोलीकरन करण्याचे आवाहनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी साखरवाही बाळकृष्ण भगत यांच्या दाळमील ला भेट दिली. आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतक-यांनी शेतसह दाळमील सारख्या उद्योग करण्याचे आवहण केले.

Post a Comment

0 Comments