- जिल्हातील अॅक्टीव्ह बाधिताची
- संख्या २८
- आतापर्यंतचे कोरोना बाधित ५४
- ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील रूग्ण !
- भद्रावतीचे बाधित जम्मूचे, कामठी रुग्णालयात दाखल, चंद्रपूरमध्ये त्यांची नोंद नाही
(चंद्रपूर कोरोना अपडेट)
जम्मू कश्मीर मधील रहिवासी असणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा स्वॅब वरोरा येथे १६ जून रोजी घेण्यात आला होता. या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती कामठी येथील विशेष रुग्णालयात संदर्भित झाले असून त्यांचे राज्य जम्मू-काश्मीर असल्यामुळे त्यांची नोंद चंद्रपूर येथील बाधितांमध्ये घेतली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. भद्रावती येथे जम्मू येथून 10 जून रोजी सदर नागरिकाचे आगमन झाले. गृह अलगी करणात असणाऱ्या या व्यक्तीची 16जुन रोजी तपासणी केली होती. स्वॅब अहवाल 17 जून रोजी प्राप्त झाला. सदर व्यक्ती सध्या कामठी येथील विशेष रुग्णालयात संदर्भित करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून घेतली जाणार नाही आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील एका बावीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज बुधवार दिनांक १७ जून रोजी आलेल्या या एका पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची आतापर्यंतची संख्या ५४ झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह बाधितांची संख्या २८ आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहिती नुसार हा २२ वर्षीय युवक मुंबई येथून १२ जून रोजी गांगलवाडी येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये होता. लक्षणे दिसून आल्यानंतर १५ तारखेला ब्रह्मपुरी कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. १६ जुन रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. १७ जून रोजी युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून या पॉझिटिव्ह बाधितासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या ५४ झाली आहे.
तत्पूर्वी काल १६ जून रोजी पॉझिटिव्ह बाधिताची संख्या एकूण ५ झाली होती. यामध्ये नवी दिल्ली नजीकच्या गुडगाव या शहरातून चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या ३२ वर्षीय व्यक्ती, राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक, बल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील आई आणि मुलगी, ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या १९ वर्षीय युवकाचा समावेश होता.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) आणि १७जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५४ झाले आहेत.आतापर्यत २६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५४ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता २८ झाली आहे.
0 Comments