महाराष्ट्रात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा  • वंचित बहुजन आघाडी चे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस जातीय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, या घटनांचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोंभुर्णा तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार यांना सादर करण्यात आले
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे अशी देशात मान्यता आहे. छत्रपती शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा ठसा या राज्यातील तमाम जनतेच्या घर करून बसला आहे. व त्यांचे विचार हाच जीवनाचा मार्ग योग्य आहे हे त्यांच्या आचरणातून प्रतिबिंबित होते,असे असतांना जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महान व्यक्तींच्या विचारसरनिचे तत्व धुळीस मिळाले आहे.महाराष्ट्रातील होत असलेल्या अत्याचारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदन तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत पाठविण्यात आले.

या निवेदनात अरविंद बनसोडे मुक्काम रा- पिपळधरा ता- नरखेड, जि- नागपूर, याची 27 मे 2020 रोजी उच्चवर्णीयांनी भर रस्त्यात हत्या केली. तो बौद्ध समाजाचा होता. या प्रकरणातील तपास कारवाई कार्यक्षम व कठोर न्यायाच्या भूमिकेतून होत नाही आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, विराज जगताप रा- पिंपळे सौदागर, जि- पुणे या बौद्ध तरुणावर उच्चवर्णीयांनी हल्ला केला. त्यात तो तरुण मरण पावला, दगडू धर्मा सोनवणे रा- महिंदळे ता. भडगाव, जि. जळगाव या बौद्ध समाजाच्या व्यक्तीच्या घरावर 7 जून 2020 रोजी उच्चवर्णीयांनी हल्ला केला. घरातील स्त्रियांच्या अंगावर हात टाकून त्यांचा विनयभंग केला व त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली, साळापुरी जि- परभणी येथे पाच बौद्ध तरुणावर 15 ते 16 इतर उच्च समाजाच्या भीषण हल्ला करून मारहाण केली व त्याला मरणप्राय अवस्थेत सोडले, राहुल अडसूळ, कोरेगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर येथे गावातील इतर समजातोइल उच्च जातीच्या लोकांनी मिळून हल्ला केला. यात जातीवाचकशिवीगाळ करुन डोक्यात लाकडाने मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ केली. या बाबतीत एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला आहे, बीड जिल्ह्यातील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड नुकतेच महाराष्ट्रभर गाजले आहे. हा प्रकार सुद्धा उच्च वर्णीयांकडून घडला आहे, चंदनापुरी (खुर्द), ता. अंबड, जि. जालना येथे बौद्ध परिवाराला २०-२५ जणांच्या उच्चवर्णीय समाजाच्या टोळीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली, मंठा, जि. जालना येथील दलित शिक्षकाला गावातील उच्चवर्णींयाकडून केल्याजाणाऱ्याशिवीगाळाला,मारहाणीला कटांळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले. त्यांच्यामागे त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जीवीताला धोका आहे,जिल्हा परभणी ता.सोनपेठ मधील निळे या गावातील बौद्ध महिला संरपचांना व बौद्ध कुटूंबांना कोरोना काळात गावातील शाळेत विलगीकरण (क्वारंटाईने) केले म्हणून मारहाण करण्यात आली. शिवायसरपंचाच्या पतीसहि बेदम मारहाण केली. या बाबतीत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आंतरजातीय प्रेम प्रकरणातून त्या तरुणाच्या कुटुंबातील कुटूंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली, दिनांक 08 जून रोजी साळापुरी ता. परभणी येथे बौद्ध तरुणावर उच्चवर्णीय लोकांनी जीवघेणा हल्ला केला,बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागदरा गावी दि. १२ जून रोजी होलार समाजातील व्यक्तीवर प्रचंड हल्ला झाला या घटनांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.

कोरोना काळात सबंध जग बंदिस्त असतांना राज्यातील जातीयवाद उफाळून आलाय. अशा अनेक अत्याचाराच्या घटना राज्यात या दोन महिन्यात घडलेल्या आहेत. या सर्व घटनांच्या बाबतीत ठोस कारवाई पोलिसांकडून झालेली नाही. यामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा गुन्हेगारांना मिळतो आहे. तसेच त्या-त्या भागातील मंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदार निष्क्रिय दिसून येत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांचा त्यांच्यावर वचक राहिलेला दिसत नाही. उलटपक्षी गृहमंत्री यांच्या पक्षाचा कार्यकर्ता व जवळची व्यक्तीच नागपूरच्या बनसोडे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे म्हणून त्यास वाचविण्याचा प्रयत्न होतोय असे दिसते.
महाराष्ट्राच्या विविध भागात वरील जातीय अत्याचाराचे गुन्हे घडलेले आहेत. हे सर्व गुन्हे जातीय स्वरूपाचे असून वरिष्ठ वर्णीय लोकांनी बहुतांशी बौद्ध धर्माच्या लोकांवर व इतर मागासलेल्या छोट्या वर्गाच्या समाजावर केले आहेत असे दिसते. सदर गुन्हे मुद्दाम घडवून आणले जात आहेत असे स्पष्ट दिसते.
सरकारच्या वतीने वरील सर्व प्रकरणात काय व कोणती व कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षेत येणारी कारवाई केली. याची तारखेनिहाय माहिती मा. मुख्यमंत्री महोदयांनी माहिती द्यावी अशी आम्ही मागणी केली आहे, जर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नसेल तर त्वरित ती निपक्षपाती होईल अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली.
या निवेदनात पुणे,अहमदनगर, बीड, नागपूर व महाराष्ट्रातीलइतर अत्याचार प्रवण भागासह प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालये स्थापन करणे, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याच्या कलम १५ नुसार अरविंद बनसोड आणि विराज जगताप या अत्याचाराच्यासह इतर सर्व प्रकरणातील तक्रारदारांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील त्या त्या ठिकाणी नियुक्त करावेत, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिकदृष्ट्या जागरूक पोलिस निरीक्षकांकडून या जातीय अत्याचाराची चौकशी करण्यात यावी, पीसीआर आणि अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंद कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता आणि देखरेख समितीची तातडीने बैठक घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तूस्थिती अहवाल प्रकाशित करण्यात यावी अश्या विविध मागण्या करण्यात आल्या

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्याम गेडाम जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर, अविनाश वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल चंद्रपूर, चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ, अतुल वाकडे युवा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,रवि तेलसे तालुका महासचिव भारीप बहुजन महासंघ पोंभुर्णा आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments