भद्रावती येथील पुन्हा एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह !



  • जिल्हयात गुरुवारी आढळले २ कोरोना बाधीत!
  • जिल्ह्यात 74 हजारांवर नागरिक दाखल
  • ॲक्टीव्ह बाधीतांची संख्या 4
  • आतापर्यंत 22 बाधीत कोरोनातून बरे
  • एक हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
  • 67 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
  • नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
(चंद्रपूर कोरोना अपडेट)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना बाधित नागरिकामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह बाधिताची संख्या २६ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे हैदराबाद येथील नालाकुंडा जिल्ह्याचे रहिवासी असणारे हे गृहस्थ सध्या भद्रावती येथे कार्यरत आहेत. १ जून रोजी ते हैदराबाद वरून भद्रावती येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची तपासणी चंद्रपूर येथील शकुंतला लॉन येथे करण्यात आली. ते एकटेच घरी राहत असल्यामुळे त्यांना गृह अलगीकरण (होम कॉरेन्टाइन ) करण्यात आले. ३ जून रोजी वरोरा येथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज सायंकाळी त्यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.

जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण बाधीत संख्या 26

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन


चंद्रपूर,दि.4 जून: सकाळी हरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील 30 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता व हैद्राबाद येथून आलेल्या भद्रावती येथील 49 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 26 झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत 22 रुग्ण कोरोना मुक्त झाले.त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या दोन रुग्ण कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले असून मुल व भद्रावती येथील एकुण 2 पॉझिटिव्ह रुग्णाला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 4 असून या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.जिल्ह्यात एकूण 14 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तीन कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले असून 11 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.

14 कंटेनमेंट झोन मधील आयएलआय व सारी रुग्णांचे आजपर्यंत 42 स्वॅब नमुने घेण्यात आले असून एकूण 39 निगेटिव्ह व तीन प्रतीक्षेत आहेत.

सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे व आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 25 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-5, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

जिल्ह्यामध्ये 1 हजार 235 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 26 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 27 नमुने निगेटिव्ह तर 182 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 4 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 799 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 1 हजार 106 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.तालुकास्तरावर 403 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर,जिल्हास्तरावर 290 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 74 हजार 477 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 67 हजार 264 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 7 हजार 213नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण बाधीत 2 ), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ) 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत 26 झाले आहेत.आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 26 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 4 आहे.

Post a Comment

0 Comments