वरोरा शहरात एकाच दिवशी ५ बाधित !
  • चंद्रपूर जिल्ह्यातील ५३ बाधित कोरोना मुक्त
  • आतापर्यतची बाधित संख्या ८७
  • जिल्ह्यातील बाधित ३४

(चंद्रपूर कोरोना अपडेट)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एकाच कुटुंबातील चार नागरिक बाधित आढळून आले. आहे तर अन्य एक नागरिक देखील वरोरा येथील आहे. याशिवाय भद्रावती येथील एक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे २८ जून रोजी रात्री उशिरा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना बाधिताची संख्या ८७ झाली आहे.
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या यामुळे ३४ झाली. असून आतापर्यंत ५३ कोरोना मुक्त झाले आहे.

 आरोग्य विभागाकडून रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार वरोरा येथील कासमपंजा वार्ड मधील हैदराबाद वरून आलेल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे. बाधित रुग्णाच्या ५४ वर्षीय सासू, २५ वर्षीय साळा, बारा वर्षीय मुलगा व नऊ वर्षीय मुलीचा यामध्ये समावेश आहे. २७ जून रोजी स्वॅब घेण्यात आले होते. २८ला त्यांचा सर्वाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
     या कुटुंबाशिवाय वरोरा येथील मालवीय वार्ड येथील ३५ वर्षीय पुरुष देखील पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. २५ तारखेला आपल्या पत्नीसह मुंबई येथून परत आलेल्या या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पत्नीला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते.पत्नीची स्वॅब चाचणी निगेटिव्ह आली मात्र पतीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
    वरोरा येथील या  पाच रुग्णांसोबतच आज भद्रावती शहरातील बागडे वार्ड, सावरकर नगर येथील ४७ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी हरियाणा येथून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील काही व्यक्तींच्या चाचणीत या ४७ वर्षीय पुरुषाचा अहवाल बाधित म्हणून पुढे आला आहे. २७ जून रोजी संपर्कातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले होते.

    आजचे सर्व 6 पॉझिटिव्ह व्यक्ती अलगीकरणातील असल्यामुळे कुठेही शहरात अतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्यात आलेले नाही. या सहाही बाधितामध्ये कोणतेही लक्षणे नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
   चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) आणि २८ जून ( एकूण ६ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ८७ झाले आहेत. आतापर्यत ५३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ८७ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ३४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments