शौकिन नगरसेवक 'पाप्पय्या' चा 'आंबट कारनामा !




  • जिल्ह्यातील रिष्ठ कांग्रेस नेत्यांनी दखल घेण्याची नागरिकांची मागणी !
  • गडचांदुर न.प. चे स्विकृत सदस्य पाप्पय्या पोन्नमवार यांच्या फेसबुक वरील स्टेटस् प्रकरण!




गडचांदूर : शनिवार दि. २७ जुन २०२० रोजी गडचांदुर न.प. चे स्विकृत सदस्य पाप्पय्या पोन्नमवार यांच्या फेसबुक स्टेटस् मध्ये रात्री जवळपास १० च्या नंतर ब्ल्यु फिल्म दिसत असल्याचे गडचांदुर मध्ये अनेकांनी बघितले. फेसबुक स्टेटस् मध्ये दिसत असलेल्या या चित्रफितीमुळे अनेकांच्या भुवया ही उंचावल्या, काहींनी नगरसेवकांच्या स्टेटस् वरील ही चित्रण बघून कानाडोळा केला तर काहींनी ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे, असे ओळखून त्याचे स्क्रिन शॉट काढले. यामध्ये कुणाला बदनाम करणे हा विषय बिलकुल नव्हता. पाप्पय्या पोन्नमवार हे गडचांदुर किंवा राजुरा कांग्रेससाठी नविन नांव नाही. काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी असलेले पाप्पय्या पोन्नमवार सद्यस्थितीमध्ये गडचांदुर नगर परिषदेमध्ये स्विकृत सदस्य आहेत. यापुर्वी ते तत्कालिन गडचांदुर ग्रा.पं. व यापुर्वीचे न.प. चे किंग मेकर म्हणून ओळखल्या जायचे. काँग्रेस पक्षाचा मोठा नेता अशी पाप्पय्या पोन्नमवार यांची राजुरा व गडचांदुर मध्ये ओळख आहे. पाप्पया पोन्नमवारांनी अनेकांचे राजकीय आयुष्य घडविले (बिघडविले(?) नाही ) आहे. पाप्पया पोन्नमवार यांच्या फेसबुक स्टेटस्मध्ये दिसणारी चित्रफित/फोटो हा अनेकांसाठी तोंडात बोटे टाकणारा विषय होता. मनुष्य म्हणून अनेकांनी विविध शौक-छंद-आवडी(?) पोसल्या-जोपासल्या आहेत, त्यातील बऱ्याचशा वाईट ही असतात, त्या सार्वजनिक व्हायला नको यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने जपत असतो. समाजसेवक, राजकारण्यांचे याकडे विशेष लक्ष असते. कारण राजकारणी, समाजसेवक म्हणजे सर्वसामान्यांशी, त्यांच्या कुटूंबांशी सरळ जुळणारे विशेष व्यक्तीमत्व असते. दोष साऱ्यांमध्येचं असतात, परंतु आपल्या दोषाला सांभाळूनचं समाजसेवा करावी लागते. समाजसेवकांकडून, राजकारण्यांकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा असतात.
एखाद्या समाजसेवकांच्या आंबट आवडी (?) समाजमाध्यमांवर (सोशल मिडीयावर व्हायरल होत असेल तर ते घोकादायक आहे, हे ओळखून गडचांदुर चे हित जोपासणाऱ्यांनी त्या आपल्या मोबाईल मध्ये सेवन केल्या, आपल्या हितचितकांना त्या व्हायरल केल्या. रविवार दि. २८ जुन रोजी गडचांदुर-राजुरा याठिकाणी या पाप्पय्या पोत्रमवार यांच्या फेसबुक स्टेटस् वरील या 'बायात बाबी अनेकांच्या मोबाईलवर फिरू ही लागल्या. त्यानंतर आज सकाळी (२८ जुन) पाप्पय्या पोन्नमवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी हे स्टेटस् डिलीट केले आणि त्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली. परंतु ही दिलगिरी व्यक्त करतांना त्यांचा अज्ञानपणा स्पष्ट जाणवणारा होता. त्यांनी दिलगिरी च्या पोस्ट मध्ये आपल्या लहान मुलांच्या हातांनी ही चुकी झाल्यांचे लिहीले आहे. पाप्पया यांचा लहान मुलगा अंदाजे ७ वर्षाच्या वर नाही, असे गडचांदुरवासी सांगतात. मग झालेली चुक ही पाप्पया यांच्यामुळेचं झाली होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या मुलाला चुकीवर पर्दा टाकण्यासाठी वापरायला नको होते, याची ही चर्चा आज दिवसभर गडचांदुर मध्ये होत होती. पाप्पय्या यांनी ही चुकी स्वतः कबुल करून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा किंवा बरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाप्पय्या पोत्रमवार यांचेकडून पक्षाचाचं राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी आज गडचांदुर शहरामध्ये होत आहे.

मध्यस्थी करणारा 'गडचांदुर" चा तो 'आंबट शौकीन" समाजसेवक ?



या प्रकरणानंतर ज्यांनी ज्यांनी हे व्हिडीओ/स्क्रिन शॉट बघितले, व्हायरल केले त्या साऱ्यांनाच एकवटण्यासाठी (?) गडचांदुर च्या एका आंबट शौकीन समाजसेवकाने पुढाकार घेतला. त्या आंबटशौकीनांनी सकाळपासून सर्च मोहिम राबवून त्यांचे तोंड दाबण्याचे कामात घेतलेला पुढाकार हा ही गडचांदुर मध्ये आज चर्चेचा विषय होता. 'कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचा या प्रकारावर ही आळा बसायला हवा. स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारा हा गडचांदुर चा नवपुढारी त्याच्या कारनाम्यामुळे गडचांदुर मध्ये चांगलाच परिचित आहे. स्त्रिलंपट असलेल्या या नवपुढाऱ्याने 'आपलं झाकण्याचा...' विचार करायला हवा. परंतु आपले तर लपवायचे आणि दुसऱ्याचे ही झाकायचे ! असा प्रताप बिल्कुल करायला नको. गडचांदुरवासीय या स्त्रीलंपटाचे अनेक कारनामे मोठ्या चवीने सांगत असतात आणि त्यामध्ये नविन भर ही टाकीत असतात. खरा समाजसेवक असेल तर त्याने "भडवागिरी-दलाली सोडून समाजसेवाचं करायला हवी" असे आजचं एका गडचांदुरवासी ने आम्हाला फोनवर सांगीतले. या भडव्याच्या काही 'ऑडीयो क्लिप व्हायरल होत आहेत. त्या जर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्या तर त्याचे फक्त पदचं धोक्यात नाही तर त्याचे भविष्य ही धोक्यात राहील, याची जाणिव अशा दलाल समाजसेवकांनी ठेवायला हवी. चोरी करतांना पकडला गेला तो चोर असतो अन्यथा सगळेचं साव असतात. याची जाणिव प्रत्येक समाजसेवकांनी ध्यानात घ्यायला हवी. पद आणि त्याची गरिमा काय असते ? 'सत्तेचा माज नको' याची जाणिव जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी यावेळी संपुर्ण महाराष्ट्राला करूनच दिली आहे, नवतरूणांनी पवारसाहेबांपासून फार काही शिकण्यासारखे आहे. विशेष करून राजकारणात प्रवेश करणानऱ्यांनी तर सत्तेचा आणि पदाचा माज बिलकुलचं करू नये, ते जनतेचे प्रतिनिधी आहेत, राजे नाहीत याचा विसर त्यांना आज तरी पडायला नको.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या