चंद्रपूरातील जुनोना रोडवरील शिवाजी नगर येथे मिळाला पुन्हा एक रूग्ण!



  • २४ पैकी अॅक्टीव्ह रुग्ण संख्या झाली ४ !

(चंद्रपूर कोरोना अपडेट)

चंद्रपूर येथे मुंबईवरून १ जून रोजी आलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने कळविले आहे.
३१ मे रोजी मुंबईवरून निघालेला हा व्यक्ती १ जून रोजी चंद्रपूरला पोहचला. जुनोना रोड शिवाजी नगर चंद्रपूर येथील या व्यक्तीने दुपारी लक्षणे आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क केला. या ठिकाणी कोविड आयसोलेशन वार्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. १ जूनला सायंकाळी स्वॅब घेण्यात आले.
२ जूनला रात्री उशिरा त्यांच्या अहवाल पॉझिटीव्ह आला. सदर व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर काही वेळ घरी गेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई - वडिल , पत्नी, मुलगी यांचाही स्वॅब घेण्यात येणार आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २४ झाले आहेत.आतापर्यत २० रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २४ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ४ आहे.

Post a Comment

0 Comments