अवैधरित्या वाळु वाहतुक प्रकरणी ट्रॅक्टर जप्ती !


  • चार आरोपींवर गुन्हा दाखल !
  • बल्लारपूर वनविभागाची कारवाई !

चंद्रपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्राअंतर्गत उपक्षेत्र कळमना मधील लावारी-1 बिटातील कक्ष क्र. 573 मध्ये शनिवार दि. 20/06/2020 रोजी अवैधरित्या खोदकाम करुन वाळुची वाहतुक करुन वाळु लावारी गावालगत जमा करुन ठेवल्याचे निदर्शनास आले असता या प्रकरणी क्षेत्र सहाय्यक कळमणा आकाश मल्लेलवार, वनरक्षक मनोज धाईत, वनरक्षक राकेश शिवनकर, वनरक्षक संजय सुरवसे यांनी चौकशी करुन 4 आरोपीवर वनगुन्हा क्र. 8/16 दि. 20/06/2020 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 26 (1) ग अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ट्रॅक्टर मालक विनोद सुंदर बत्तलवार रा. बल्लारपुर, ट्रॅक्टर चालक मंगेश सुरेश पाचभाई रा. बामणी बेघर, मजुर परमेश्वर कर्णु सोयाम रा. लावारी, सुरज आनंद मडचापे रा. लावारी या चार आरोपींवर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन विनोद सुंदर बत्तलवार रा. बल्लारपुर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर महिंद्रा B275 DI 735 ट्रक्टर व ट्रॉली क्र. MH 34 L 2358, ट्रक्टर वाहन जप्तीची कार्यवाही करुन वाहन वनपरिक्षेत्र बल्लारशाह यांचे कार्यालयात ठेवण्यात आलेले आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्री. गजेंद्र हिरे यांचे मार्गदर्शनात बल्लारशहा चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे.

महसुल विभागाकडुन अनाधिकृत गौण खनीजाची जप्त केलेली वाहने सोडतांना गौण उपजाचे बाजार मूल्य, अधिक 5 पट दंडाची रक्कम व स्वामीत्वधन तथा गौण उपजाची वाहत्क ज्या वाहणाने होत आहे. त्या वाहणाचे प्रकारानुसार दंडाची रक्कम आकारल्या जाते. उदा. एक ट्रॅक्टर सोडण्याकरीता महसुल विभाग कमीत कमी रुपये 1,00,000/- दंड संबधितांकडुन वसुल करतात. त्यानुषंगाने व वनकायद्यांवये पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे वनक्षेत्रातून अनाधिकृत गौण खनीजाचे उत्खनन व वाहतुकीस आळा घालणे शक्य होईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह संतोष थिपे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments