खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस गडचांदूरात उत्साहात साजरागडचांदूर न. प. स्विकृत सदस्य (?) पापय्या पोन्नमवारची मुजोरी...!काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस गडचांदुर मध्ये काँग्रेस पक्षातर्फे साजरा करण्यात आला. मास्क व फळ वाटपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेल्या या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाची बातमी प्रकाशनासाठी फोटो सहीत व्हायरल करण्यात आली. यामध्ये गडचांदूर न. प. चे स्विकृत सदस्य (?) पापय्या पोन्नमवार हे शासनाच्या निर्देशाला बगल देत कोणताही मास्क तोंडावर न ठेवता राष्ट्रीय नेत्याच्या जन्मदिनानिमित्त जनसामान्यांना काय संदेश देत आहे? याचे उत्तर राजूऱ्याचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी द्यायचे आहे की मुजोरभारती पापय्या पोन्नमवार हे स्वत: देतील? हे ठरवावे. मुजोर पाप्पय्या हे काॅंग्रेसचे फार जुने सदस्य आहेत.
सर्वसामान्यांनी मास्क वापरला नाही तर त्यांना दंड आकारण्यात येतो मग पापय्या सारख्या मुजोर नगरसेवकांना यामध्ये विशेष मुफा देण्यात आली आहे कां? यावर कारवाई अवश्य व्हायला हवी? आता ही कारवाई करेल कोण? आमदार की मुख्याधिकारी?

गडचांदूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस गडचांदुर मध्ये काँग्रेस पक्षातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णांना मास्क व फळ वाटप करण्यात आले.या वेळी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी सभापती नोगराज मंगरुळकर , नगराध्यक्ष सौ. सविताताई टेकाम, हंसराज चौधरी, सभापती विक्रम येरणे, बाबा गोरे सभापती जयश्री ताकसांडे, स्वीकृत सदस्य पापय्या पोन्नमवार, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चनाताई वांढरे,शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे, कार्याध्यक्ष अहमदभाऊ, युवक काँग्रेस चे लोकसभा महासचिव शैलेश लोखंडे, सुरेशजी टेकाम,प्रीतम सातपुते,विठ्ठलराव कांबळे, रुपेश चुदरी, राहुल ताकसंडे, आशिष वांढरे, महावीर खटोड, प्रणय टेकाम अजय यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांन्नी स्यानिटायझेशन आणि सोशल डिस्टंसीग बाबत विशेष सावधानी बाळगत कार्यक्रम पार पाडला.

Post a Comment

1 Comments

  1. कुठे दिसत आहे सुरक्षित अंतर,सोशल distancing

    ReplyDelete