पीडित महिला शेतकरी विठाबाई काशिनाथ घुगुल न्यायाच्या प्रतिक्षेत !'



  • डीजीटल मीडीया असोसिएशन च्या पत्रकार परिषदेत मांडली कैफियत!
  • तत्कालिन वित्त आणि नियोजन वनमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना २६ जुलै २०१७ दिलेल्या पत्राला केराची टोपली !

तुमची जमिन माजी सैनिक यांना बक्षिस देण्यात आल्याची खोटी माहिती देऊन बळजबरीने ताबा घेणा-या हरीदास चंद्रभान झाडे आणि तलाठी मेश्राम यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राजुरा तालुक्यातील पीडित महिला शेतकरी विठाबाई काशिनाथ घुगुल (वय ७५, रा. रामपुर) यांनी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तत्कालिन वित्त आणि नियोजन वनमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात २६ जुलै २०१७ दिलेल्या पत्र दिले होते, त्या पत्राला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली असलेल्या दिसत आहे.

त्यांनी यावेळी सांगितले की, राजुरा तालुक्यातील माथरा गावाजवळील मौजा खैरगाव रिठ शेत सर्वे नं . २० ( जुना ) नविन २२ क्षेत्र ५.७७ हे . आर ही शेती अर्जुना देवाळकर मागिल १ ९ ६६ पासुन १ ९ ८६ हे स्वतः शेतामध्ये कसुन उपभोग घेत होते. त्याची जुन्या सातबारा पे-याला नोंद आहे . त्यांच्या मृत्युनंतर मुलगी विठाबाई काशिनाथ घुगुल या सर्वे नं . २२ क्षे . ५.७७ हे.आर वर शेतामध्ये कसुन त्याचा उपभोग घेत होत्या. सन १ ९८६-८७ व ८७-८८ संपुर्ण शेत ताब्यात होते. त्याची नोंद सातबारा व एक ई ला आहे . सन ८८-८९ मध्ये संपुर्ण शेत विठाबाई काशिनाथ घुगुल यांच्या ताब्यात असतानाही कोणतीही पुर्व सुचना न देता या शेतात श्री . शामराव राजु घोंगडे यांनी सदर जमिनीपैकी २ हेक्टर वर बळजबरीने ताबा घेतला. त्यामुळे विठाबाईकडे ३.७८ हे.आर जमिन शिल्लक होती आणि त्या जमीनीचा उपभोग सन १ ९९ ४ – ९ ५ मध्ये श्री . शशिकांत रामचंद्र शेंडे यांच्या नावाची नोंद ९ .७७ हे आर वर चुकीने करण्यात आली होती. परंतु सदर जमिन ३.७७ हे.आर विठाबाईच्या ताब्यात होती. सदर जमिनीचे कागदपत्र आहे. त्यानुसार त्या सदर जमिन ३.७७ हे.आर वर कसत होत्या. तरी सन २०११ मध्ये मात्र १.७७ हे.आर जमिन खाली करण्याचे पत्र आले. परंतु माझे शेतामध्ये उभे पिक असल्यामुळे दि . १६.०८.२०११ ला उपविभागिय अधिकारी राजुरा यांचेकडुन स्थगनादेश काढला व त्याची मुदत सन ०७.०४.२०१२ पर्यंत होती व त्या स्थगनादेशाची प्रत माझेकडे आहे, अशी माहिती विठाबाई काशिनाथ घुगुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
० ९ .०२.२०१५ मध्ये मला २ हेक्टर जागेवरिल अतिक्रमन नियमित करण्याबाबत पत्र आले. त्या पत्रानुसार दि . १६ . ०४.२०१५ या दिवशी मोजनी केलेली आहे. त्या मोजनीमध्ये क प्रत मध्ये ३ हे . ४३ आर जमिनीवर विठाबाईचा ताबा दर्शविलेला आहे. शेतीमध्ये सन जुलै २०१५ मध्ये माझी कपाशी पेरलेली असतांना तलाठी सजा अहेरी येथिल तलाठी मेश्राम व हरीदास झाडे व इतर अनोळखी व्यक्ती शेतात येवुन तुमची जमिन माजी सैनिक यांना बक्षिस देण्यात आलेली आहे . तरी सदर जमिनीचा ताबा सोडुन सदर जमिन खाली करण्यात यावी, अशी सूचना केली. त्यावेळी जमिनीवर माझे उभे पिक असतांना ते पिक श्री . हरीदास झाडे माथरा , श्री. तलाठी मेश्राम यांनी मोडुन काढले व त्यांनी बळजबरीने ताबा घेतला, असा आरोप विठाबाईने केला आहे.

आदेश पारित; अंमलबजावणी नाही,

ही जमीन माजी सैनिकाला दिली नसून फसवणुक करून श्री हरिदास झाडे यांनी बळकावली आहे, असे लक्षात आल्यानंतर मी दि . २४.० ९ .२०१५ रोजी तहसिलदार राजुरा यांच्याकडे तकार अर्ज दाखल केला. तत्कालीन तहसिलदार यांनी झाडे यांच्याविरूध्द मौजा खैरगावं रिठ येथिल शेत सर्वे नं . २२ पैकी आराजी २.०० हे.आर जमिनीवर केलेले अतिक्रमण गैरकायदेशिर व अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने झाडेयांच्या विरुध्द महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १ ९ ६६ चे कलम ५० ( २ ) अन्वये १००० / – ( एक हजार रूपये ) दंड आकारूण सदर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करण्यात येवुन ३ दिवसाचे आंत अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १ ९ ६६ कलम ५० ( ३ ) व ( ४ ) अन्वये १००० / – रू . दंड व प्रतिदिन ५० / – रू . प्रमाणे दंड वसुल करण्यात येईल, असा आदेश दि . २६.११.२०१५ रोजी पारित केला.

नावाची खोटी नोंद.

तत्कालिन वित्त आणि नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांनी दि . २६.०७.२०१७ रोजी विठाबाई काशिनाथ घुगुल यांच्या निवेदनातील नमुद बाबी तपासून मागणीच्या पुर्ततेबाबत आपल्या स्तरावरून झाडे यांचेवर उचित कार्यवाही करुन कार्यवाहीचा अहवाल तात्काल सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट हरी झाडे यांना अतिक्रमण नियमित करण्याकरिता सहकार्य केल्या गेले व सदर जमिन सन २०१५ माझे अतिक्रमणात असतांना सुध्दा सन २०१३-१४ चे श्री . हरिदास झाडे यांचे नावाची खोटी नोंद करण्यात आली.त्यानंतर दि . १७.०६.२०१६ ला तक्रार अर्ज दाखल केला असता तहसिलदार यांचे नावे दिला असता त्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाही केलेली नाही. सदर व्यक्ती हा राजकीय नेता असल्यामुळे राजकीय दबावामुळे कोणतीही कायदेशिर कारवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप विठाबाईने केला आहे.

न्यायाची अपेक्षा.

झालेल्या फसवणुकीमुळे हरीदास झाडे यांची सन २०१३-१४ पासुन एक ई ला घेतलेली नोद रद्द करण्यात यावी, तात्कालीन तहसिलदार, पटवारी मेश्राम यांचे पेशंन रोखून त्यांना सेवेतुन बळतर्फ करण्यात यावे. हरीदास झाडे यांच्यापासून जिवितास धोका आहे. हरीदास झाडे यांच्या सततच्या धमक्यामुळे शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याने संरक्षण देण्याची मागणी विठाबाई काशिनाथ घुगुल यांनी केली. यावेळी बंडू घुगुल, बापूजी घुगुल, सदाशिव गाडवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments