आर्यन कोल वॉशरीजमध्ये कोरोना नियमांना "ठेंगा" !  • निर्देशांना बगल देत परप्रांतीय मजूरांचा खुलेआम वावर !
  • गावाला संसर्गाचा धोका!
  • प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गावकर्‍यांची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी !

राजुरा (प्रति.)
महाराष्ट्र राज्यात कोरानोचा वाढता प्रादुर्भाव बघता खडक निर्बंधासोबतचं दोन दिवसांचा "विकेंड लॉकडाऊन" लावण्यात आला असून राज्य सरकारतर्फे लवकरच एक किंवा दोन आठवड्याचा कडक "लॉकडाऊन" लावण्याचे संकेत मिळत आहे. अशातचं जिल्ह्यातील काही उद्योगांकडून शासनाच्या निर्देशांची पायमल्ली केल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे, ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील आर्यन कोल वॉशरीजमध्ये कोळशाची वाहतूक करण्यासाठी परराज्यातून रोज १५0 च्या वर ट्रक फेर्‍या मारत असतात. या ट्रकचे चालक वाहक तसेच काम करणारे मजूर कोरोना नियमांचे पालन करीत नसून हे सर्व लोक विनामास्क बिनधास्तपणे परिसरात फिरत असतात.
दररोज १५0 ते २00 ट्रक परप्रांतातून कंपनीत येत असल्याने येथे काम करणारे कामगार व लगतच्या पांढरपोवनी गावाला कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला असून यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ह्या ट्रक चालक तसेच वाहकाची कोरोना प्रतिबंधात्मक चाचणी झाली आहे अथवा नाही ह्याची कोणतीही खातरजमा कंपनीद्वारे केल्या जात नसुन परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ७२ तासापूर्वी घेतलेला कोरोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक असुनही कंपनी चालक वाहकाची चाचणी झाली अथवा नाही ह्याची कुठलीही शहानिशा करत नाही.
हे चालक वाहक बरेचदा गरजेच्या वस्तु घेण्यासाठी गावातील दुकानात येतात मात्र ते मास्क लावत नाही आणि कुणी त्यांना हटकले तर उलट अरेरावी करतात. ह्यांच्या अशा वागण्यामुळे अर्थात गावांत कोरोना संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही आणि असे काही घडल्यास आर्यन कोल वॉशरीज ह्याची जबाबदारी घेणार का असा संतप्त सवाल गावकऱ्यांच्या वतीने संदिप गायकवाड ह्यांनी केला असुन ह्या संदर्भात तहसीलदार राजुरा ह्यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन काय कारवाई करते ह्याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागून असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय कोल वॉशरीमध्ये कार्यरत कर्मचारी इतर ठिकाणाहून जाणेयेणे करीत असल्याने त्यांचीसुद्धा चाचणी असतानाही असे जात नसल्याचे समजते. त्यामुळे एकतर कोल वॉशरी व्यवस्थापनाने प्रवासी कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था आपल्या परिसरात करावी किंवा कर्मचार्‍यांची नियमित चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आम्ही शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत असून कर्मचार्‍यांना कंपनी परिसरात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे तसेच प्रत्येक कर्मचार्‍याला हात सॅनिटाईझ करण्यास सांगितल्या जाते आणि सामाजिक अंतराचे पालन केल्या जात असल्याची भुमिका कोलवॉशरीज प्रशासनाने घेतली आहे.

औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध असुन जिल्ह्यात काळ्या सोन्याच्या खाणी सर्वत्र आहेत. अर्थात उद्योगांना विज निर्मिती तसेच इतर कामांसाठी कोळशाची गरज असते. खाणीतून निघणारा कोळसा माती मिश्रीत असतो त्यामुळे हा कोळसा स्वच्छ करणे गरजेचे असल्यामुळे स्वाभाविकपणे जिल्हय़ात अनेक ठिकाणी कोल वॉशरीज सुरू झाल्या.
राजुरा तालुक्यातही अनेक कोळसा खाणी असल्यामुळे स्वाभाविकपणे तालुक्यातही कोल वॉशरीजचा उद्योग फोफावला असुन तालुक्यातील पांढरपोवणी गावालगत कोल वॉशरीज कार्यरत आहेत. परंतु गावालगत असलेल्या आर्यन कोल वॉशरीज ह्या उद्योगात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर गावांत कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती असल्याचे गावकऱ्यांनी तहसीलदार राजुरा ह्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments