अत्यावश्यक सेवा व्यापाऱ्यांचा आज स्वयंस्फूर्तीने गडचांदूर बंद !  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गडचांदूर व्यापारी असोसिएशनचा निर्णय !

चंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यालाही या लाटेने आपल्या कवेत घेतले आहे. मागील महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात तीन अंकी आकड्यामध्ये कोरोना चे रुग्ण अडून राहिले असून धोकादायक स्थिती म्हणजे मृतकांची संख्याही फार घातक स्तरावर वाढत आहे. राज्य सरकारने दहा तारखेपासून संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले होते आणि दोन दिवसाचा "विकेंड लाॅकडाऊन" पुकारला होता. "विकेंड लाॅकडाऊन"मध्ये जीवनावश्यक वस्तूंना नुकतीच सूट देण्यात आली होती. शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी गडचांदूर च्या जिवनावश्यक वस्तु विक्रेत्यांनी बंद ठेवला परंतू आज रविवार दि. ११ एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गडचांदूर आपापली दुकाने बंद ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन नामदेवराव येरणे, गजानन पोतनूरवार, सुभाष पोतनुरवार, दीपक नाहार, विवेक येरणे, दत्ताजी शेरे , महेंद्रर सिंग, सुकेश पोतनूरवार, विक्रम येरणे इत्यादींनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्याला टीकेत संक्रमण मोठ्या स्तरावर पसरत आहे. धोकादायक स्थिती मध्ये आज चंद्रपूर जिल्हा आहे. शासनाने "ब्रेक दि चेन" चे आव्हान केले असून पण निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क चा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे जनतेला आव्हान केले आहे, त्याच आव्हानाला प्रतिसाद देत गडचांदूर च्या जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन नागरिकांनी ही शासनाच्या निर्देशांचे पालन करावे असे आव्हान विवेक येरणे यांनी या निमित्ताने केले आहे. करुणा रुग्णांची वाढलेली परिस्थिती बघता आज रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आहे व्यापाऱ्यांनी या बाबी ध्यानात घ्यावा असे आव्हान विवेक येरणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments