६ मिनीट चालण्याची चाचणी म्हणजे काय ?



चंद्रपूर : कोरोना चा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज तिन आकड्यांमध्ये कोरोना चे रूग्ण आढळत आहे, त्यापेक्षा घातक म्हणजे मृतकांची संख्या वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना काही आवाहन केले आहेत. कोरडा खोकला आणि ताप, थकवा/निरूत्साह, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणे, छातीत दुखणे, नाकाला वास न कळणे, हातापायाच्या बोटांचा रंग बदलणे, अतिसार अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता कोविड ची तपासणी करण्याचे आवाहन ही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

६ मिनीट चालण्याची
चाचणी म्हणजे काय ?
(6 Minute Walk Test !)

साधारणतः लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित व्यक्तींना गृह अलगीकरण (होम आयसोलेशन) मध्ये ठेवले जाते. तथापि, अशा रूग्णांनी आपल्या हृदय व फुफ्फुसांची क्षमता तपासणी चाचणी घरच्या घरी करता येवू शकेल. या चाचणी द्वारे Happy hypoxia किंवा Silent hypoxia म्हणजेच न जाणवणारे परंतु कमी होत जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण ओळखता येते. या चाचणीमध्ये रूग्णाणने आपल्या मधल्या बोटाला Pulse Oxymeter लावून चालावे. ६ मिनीट चालल्यानंतर रूग्णांची ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा खाली जात असेल किंवा ऑक्सिजन पातळीमध्ये ३ टक्के पेक्षा जास्त घट होत असेल किंवा दम लागणे, थकवा येणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवत असल्यास तातडीने रूग्णालयात दाखल होवून डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार घेणे आवश्यक आहे. ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती सदर चाचणी ६ मिनीट न करता ३ मिनीट पर्यंत ही करू शकतात. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी सुद्धा सदर चाचणी करणे योग्य राहील, असे आवाहन जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष संपर्क ०७१७२-२७४१६१ किंवा ०७१७२-२७४१६२ या क्रमांवर संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments