किती हा "निरालजेपणा!" !




वरिष्ठ अधिकाऱ्यातील सामंजस्याच्या अभावाचे उदाहरण !

चंद्रपूर : रविवार दि. ११ एप्रिल रोजी दादमहाल वार्डामधील एक ज्येष्ठ नागरिक उपचाराविना वनराजिक महाविद्यालयाच्या वऱ्हांड्यात पडला होता. ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने या कोरोना रूग्णांची ही अवस्था झाली. या ज्येष्ठ नागरिकाच्या नातेवाईकाने कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था बघून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर या प्रकाराचा "किती हा निरालजेपणा" या शब्दात सर्वत्र टिका होत आहे.

दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह या रूग्णाला वनराजिक महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन ची आवश्यकता असल्यामुळे या रूग्णाला वनराजिक महाविद्यालयातून शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले, परंतु बेड उपलब्ध नसल्यामुळे या ज्येष्ठ नागारिकाला परत जाउन वनराजिक महाविद्यालयाच्या वऱ्हांड्यात वेळ काढावी लागली. कोरोना-19 साठी कार्य करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील सामंजस्याचा अभाव असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. ऑक्सिजन बेड ची जिल्हा रूग्णालयात कमतरता आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रासह जिल्ह्यामध्ये उद्रेक झालेला आहे. रोज तिन आकडी संख्येमध्ये कोरोना रूग्ण जिल्ह्यात मिळत आहेत, महत्वाचे म्हणजे मृतकांची आकडेवारी ही घातक आहे. नुकतेच जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एप्स जोधपुरचे डॉ. निशांत चव्हाण व एनसीडीसी दिल्लीचे उपसंचालक डॉ. जयकरण या दोन अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक चंद्रपूरात आले होते. त्यांनी आरटीपीसीआर चाचण्या, मनुष्यबळ तसेच कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या. रोजच्या वाढीव चाचण्यामुळे रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे वारंवार प्रशासनातर्फे सांगीतल्या जात आहे. नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. नुकताच दोन दिवसांचा "विकेंड लॉकडाउन" हा जिल्ह्यात १०० टके पाळला गेला, एखादे वगळता शासनांच्या निर्देशांचे पालन नागरिकांकडून होत आहे. परंतु कोविड सेंटर मध्ये शासनाच्या निर्देशाला फक्त कागदावरचं तर कार्यान्वित केले जात नाही नां? असा संशय वरिल प्रकरणामधून व्यक्त होत आहे. वनराजिक महाविद्यालयातील होम आयसोलेशन मधील रूग्णाला ऑक्सिजन ची आवश्यकता आहे म्हणून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जाते. आक्सिजन चे बेड उपलब्ध नाही म्हणून त्या रूणाला तिथून परत पाठविले जाते आणि गृह विलगीकरणातील त्या रूग्णाचा बेड दुसऱ्याला दिला म्हणून त्या कोरोनाग्रस्त रूग्णाला नाईलाजाने वनराजिक महाविद्यालयाच्या वऱ्हांड्यात दरी टाकून काही तास काढावे लागतात, यामध्ये होम आयसोलेशन से प्रमुख व ऑक्सिजन बेड व कोविड रूग्णालयातील अधिकाऱ्यांमधील सामंजस्याचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. अत्यंत संतापजनक असलेली ही बाब दुसऱ्यांदा घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फक्त आढावा बैठकी न घेता त्यांना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावे, सन २०२० मधील कोरोना कामाचा, नातेवाईकांच्या रागाचा, ऑक्सिजन बेडच्या अवस्थेला प्रशासनाला सामोरे जावे लागले होते, तो अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. तसे या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये घडू नये, अशी अपेक्षा आज चंद्रपूरकर बाळगत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वा आरोमामंत्री नाम. राजेश टोपे यांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फ्रसिंग मध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष व मुल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्याचा अभाव असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांना केली होती. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी योग्य त्या सुचना ही केल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अवश्य विचार करायला हवा. "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" यासोबतच "माझे कर्तव्या आणि माझी प्रामाणिकता" हे धोरण ही जिल्ह्यात राबवायला हवे, असे यानिमीत्ताने सांगावेसे वाटते.




Post a Comment

0 Comments