- आजपासून महावितरण ची वसुली मोहिम सुरू !
चंद्रपूर : संकटात सापडलेल्या महावितरणने स्थानिक पातळीवर आज (दि. ११ जुन) पासून वीज बिल वसुली मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कनेक्शन कापण्याऐवजी वीज बिल भरण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. कोरोना च्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्य सामान्यजणांसाठी ही बाब डोकदुखी ठरणार आहे. "तुम्हीच सांगा लोकप्रतिनिधींनो, आता काय बरे करायचे ?" असे विचारण्याची वेळ आता सामान्यजणांवर आली आहे. मागील वर्षीपासून सर्वसामान्य कुटूंबातील आर्थिक घडी विस्कटलेली आहे. पुढील वर्षीपासून सर्व सुरळीत होईल या अपेक्षेवर असलेल्या सामान्यजणांसाठी २०२१ हे वर्ष ही कपाळावर आळ्या आणणार ठरलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले करें पुरूष, जवान मुले, तर काहींनी आपली छत्र ही गमावली आहे. रोजगार तर यापूर्वीचं हिरावला गेला होता, कोरोनाच्या संकटाने मानसिक दुर्बाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेले मृत्यू बघता व भयाचे वातावरण बघता सर्वसामान्यांना आज धिराची गरज आहे. एका आकडेवारीनुसार भारतामध्ये कोरोना काळात ९७ टक्के लोकांचे रोजगार हिरावल्याचे सांगण्यात येत आहे. बेरोजगार झालेल्यांना आता आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे काय ? असा प्रश्न आवासून उभा राहिलेला आहे. मार्च २०२१ मध्ये लागलेला लॉकडाऊन नुकताच कुठे आता मोकळा झालेला असून रोजगारासाठी भटकती सुरू असतांना खाजगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या रक्कमेच्या परतफेडीसाठी तगादा लावण्यात येत आहे तर शासकीय बँकांकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी कायद्याचे नोटीस बजावण्यात येत आहे. मागील वर्षी शासनाने बँकांना व खाजगी फायनान्स कंपन्यांना कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा न लावण्याची ताकीद बँकांना व खाजगी कंपन्यांना दिली होती परंतु यावर्षी ते औचित्य ही सरकारने दाखविले नाही. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' अशी घोषणा देऊन शासन मात्र मोकळे झाले. बेरोजगारी, कर्जाचे बोझे व कोरोनाचे डोक्यावरील संकट या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्यांना आता तुमचे तुम्हीच बघा! अशा स्थितीत सोडण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यात ही कोरोना च्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची चेतावणी ही दिली जात आहे. मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांवर कोसळलेल्या या संकटसमयी आश्वासने देण्यात व स्वतःचे फोटो सेशन करण्यात व्यस्त आहेत. 'तुम्हीच सांगा लोकप्रतिनिधींनो!' आता काय बरे करायचे ? असा प्रश्न आता मानसिक व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्यांकडून विचारल्या जात आहे.
0 Comments