वन हक्क कायदा मोडणा-या बंडा होमस्टे चे मालक अरविंद बंडा यांच्यावर कायदेशीर कडक कारवाही करा !



माननीय मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी !
पर्यावरण प्रेमीमध्येमध्ये असंतोष!

चंद्रपूर (प्रति.)

नुकतेच दि. ३१/०५/२०२१ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे बफर क्षेत्र सुमारे सकाळी ८:३० च्या दरम्यान आगझरी देवाळा गेटच्या जवळ पास (w मार्क फिमेल वाघीनीचे) दोन छावे रस्त्याने संचार करीत असता बंडा होमस्टे चे मालक श्री. अरविंद बंडा हे वाघीनीच्या छाव्याच्या संचारा मध्ये अडथळा निर्माण करीत होते. सदर दोन्ही छाव्यांना त्याच्या या प्रकारामुळे स्वतःचा मार्ग बदलावावा लागला. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बदल होत असून या व्हिडिओमध्ये अबंडा होम् स्टे चे मालक स्वतः व्हिडिओ चित्रीकरण करताना दिसत आहे.


बंडा होम स्टे चे मालक अरविंद बंडा यांचेसाठी हा प्रकार नविन नाही. स्वतः: फुशारकी मारण्यासाठी ते वन्य जिवाशी असले प्रकार नेहमीच करीत असतात. स्वतःच्या होमस्टे च्या प्रसिध्दी साठी वन हक्क कायदा तोडून प्रसिध्दी साठी वन हक्क कायदा तोडून छाव्याच्या १० फुट च्या जवळपास राहून त्याचे फोटो व व्हीडीयो शुट करीत होते व सदर व्हीडीयो ला एडीट करून स्वतःच्या होमस्टे च्या प्रसिध्दी साठी या व्हीडीयो चा वापर व प्रसार सुध्दा केला आहे. व. त्या व्हिडीओ लासोशल मिडीयाला व्हायरल सुद्धा केले आहे. रिसॉट व होमस्टे चे मालक असे कृत्य वारंवार करीत असता त्यामुळे जनतेमध्ये असंतोष व संभ्रम निर्माण झाले आहे की सदर वन हक्क कायदे हे सर्व सामान्य जनतेसाठीच आहेत काय ?

कारण या वन हक्कचे कायदे हे ताडोबा अंर्तगत होमस्टे चे मालक तोडत आहे. बंडा होमस्टे चे मालक हे स्वतःचा प्रसिध्दी साठी वारवार असे प्रकार घडवित असतात या आधी सुध्दा त्यांना अशा प्रकारचे कृत्ये केले परंतु वनविभातील अधिकाऱ्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे त्यांना कायद्याची कोणतीच भिंती नसल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये अरविंद बंडा हे स्वतः तछाव्यांयासमोर येऊन चित्रीकरण करताना दिसत आहे.

सदर प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमा. मा. दत्ताजी भरणे वनराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपुर, मा. वनसचिव मंत्रालय मुंबई, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपुर, मा. मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर व मा. उपसंचालक कार्यालय बफर झोन चंद्रपुर यांचेकडे करण्यात आली असूअरविंद बंडा यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्याच्या होमस्टेची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी सेना चे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल मेश्राम, तालुका प्रमुख पप्पी यादव, पर्यावरण प्रेमी ,चंदन सपाट, नितीन मडावी, प्रफुल सागोरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकारामुळे व पर्यावरण असंतोष निर्माण झाला असून सदर प्रकरणाची त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments