माले जुन्यासुरल्याले जाणं हाये....! मनजे जानच हाये...!!



झाडीतली बातचित....!

शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 ला मुलं तालुक्यातील जुनासुर्ला येथे आयोजित झाडीपट्टी साहित्य संमेलनानिमीत्त सौ. भारती राजू लखमापूरे वरोरा यांचा लेख वाचकांसाठी...!

आये संगीते, मनिषे , पिरते, शितले, आनंदे,सविते चालानं काकारे व लवकर लवकर त्या जुन्यासुरल्र्याले . तेथं का नाय आपल्या झाडीबोलीचं मणे भलं मोट्ट लंबचलंब संमेलन हाय मने बाप्पा.आये अरजूमन कोठ्ठ गेली. हे भवानी आता कपडेलत्ते भराचित. का हाय का पेटीत आव माय हेत लटाबटा सोडून हाय. आव तुले मायीत नाही कावं. कायले मयाकडं बयताडावाणी पायते का बया.पीसं लागल्यावाणी. आका रे तुले मायीत नाय काव . बारा तेरा तारखेले हाय नवं मोठ्ठजात संमेलन. ह्या मोठ्यामोठ्या पत्रिका छापल्या मणते थ्या अरूण भाऊंन कान... शनिवारी सुरू होते आण् इतवारी कान सरते मणते बाप्पा.. चालतं पाहून येऊन तेथची मज्जा.
झाडीबोली सायीत्य संमेलन भाय साजरं रायते मणते.. वाणोवाण गावचे लोक येणार हाय मणते. मोट्ठे मोट्ठे सायित्यिक येणार मणतेत. गडचिरोली,भंडारा गोंदिया, साकोली, गोंडपीपरी, सिंदेवायी, नेरी बाप्पा बाप्पा पुन्हा लय गावं आये. गडचिरोलीचे विनायक भाऊ,उपेदंरा भाऊ उडणखटोल्यावर येणारं हाये.आन् थो नेरीचा संत्या... संतोष नायकावं उलीसा हिरो सारखा दिसते.थो आपल्या मोटारीनं येणार हाय मणते. मंग आपणसं कायले मांग राहाचं. आन जूनासुरला गाव भाय साजरा हाय मणते बाप्पा.... जुन्या कारातले मंदिर, टेकऱ्या, तलाव.थ्या रामकृष्ण भाऊन फटू टाकला होता पाय.गोल गोल त्याले कान् लोगु मणते. भरन लवकर लवकर कपरे. मी त्या पोट्टयायकर जाऊन येतो.ए पोऱ्यायवा भरले का कपरे. बाप्पा काय ले फिदीफिदी हासता व बयांनो... आता दोन दिवस राहाचं मणजे हातरुन, पांघरून लागन का नाय . चांगल्या मोठ्या मोठ्या काठापदराच्या साड्या घ्याजो. आन् दोन दिस का नाय भाय टप्पे हाय मणते बाप्पा. तवा एका टप्याले एक सारी, दुसऱ्या टप्प्यायले दुसरी साडी. सप्पायन कानाय एकासं रंगाच्या साड्या घालाच्या. मणून मणतो लय वय कपडे घेऊन घ्या. आन संग लिपिस्टिक ,तेल, इस्नू पावडर घेऊन घ्या जो. तेथं कायी फिकरस नाय. आपल्या लक्समन भाऊचस गाव होयनावं. मग काहाची फिकीर भाऊचा गाव आपलंस गाव मायेर समजाचा. थ्या गावच्या शारंत आपली वृंदी हाय ना व मास्तरीन.आन् आपल्या रत्नीचं गाव पयलंस पडते. दोन दिस तेथस खांन,पेन,झोपनं, मस्त कान राहाले जागा , नाश्ता चाय पाणी, आन दोन टायमाचं जेवण मंग का पायजे आपल्याले.आन ते बी असंतसं नाय.एक येरा गोड,एक येरा खारट तिखट. आपला तरास बी वाचते सयपाक कराचा.तीकडं गेल्यावर येथंची काही फिकरं कराची नायं.खातं बसनं आपल्या हातांन.कवरी कराची यायची मीजास.रोजचास लागून हाय.रांधा,उचला खरकटे आन् घासा टोपलभर भांडे.आता दोन दिवस समजनं कसं लागते काम कराले.महात जीव पार इटून गेलायं.ह्या कटकटी पायी.म्यातं तेतं पयलनं जायीन. सिधा सांगूनस टाकलं माले जानं हाये मणजे जानं. जायीन त जायीन अन् एक कविता झाडूनसं येईन.
एकटीस नाय वरूऱ्यावाल्यायचा सप्पा टरकस भरून आणतो कचाकच.संग पंडीत भाऊ, चंद्रशेखर भाऊ नावनाय समद्यायले घेऊन येतो.आवमाय पंडीत भाऊ त कपऱ्यायले आता इस्तरी करून रायला.आता कवा कपरे भराचा हो...कवा जाचं हो.झालं काका महा सायीत्य संमेलन रायते काका जागेवरचं .दे उज्वले आण मयाकड थैला मी भरू लागतो कपरे.लग्नाचा कोट अन् जोडेगीन देजो घालाले.झालं भरून बाप्पा.आन् कानाय आमचा टरकबीन आला.आन् चालवणारा बीन तयार हाय सुटबूट घालून.जसं याचंस लग्न हाय काका.
आता ह्या चंद्रशेखर भाऊ कोठ्ठ रायलां आसनं आता.पुन्ना मये गुरूजी रायले. थुटे सरांनले घ्याच हाय.गुरूजी तं कवापासून तयार होऊन वाटं पहात हाय.आले आले सप्पाजन आले व माय.भाय बेस लागतं हाय बाप्पा.कवा जातो न कवा पोचतो असं झालं माय मले.
ए गाडीवाल्या हाकल गा गाडी लवकर.झाल पाडू नोको सकार वकार जाचा हाय मले.
रामरामजी सप्पायले...आवमाय बढ्यायच्या संगीले सागांच रायलसं मायं...!

Post a Comment

2 Comments

  1. अतिशय सुंदर बोलीभाषेतला संवाद....

    ReplyDelete
  2. झाडीबोलीतला सुंदर नमुना ,,,,,,,,,बरीच मंडळी झाडीबोली म्हणजे कोणती बोली, कसी लिहायची असे म्हणतात. त्यासाठी उत्तम मार्गदर्शन. भारती ताईचे अभिनंदन 🙏

    ReplyDelete