महिलादिनी सा.बां. विभागाने केला अधिक्षक अभियंता साखरवाडे यांचा सत्कार !



रस्ते-पूल वैशिष्ट्यपूर्ण इमारतींनी जिल्ह्याची ओळख निर्माण करणाऱ्या सा.बां विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे !

चंद्रपूर : क्लारा झेटकिन यांनी 1911 साली सर्वप्रथम जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. पंधरा हजार महिलांनी न्यूयार्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला होता. त्यावेळेस पासून 8 मार्च ला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यकर्तृत्ववान महिलांचा जागतिक दिनानिमित्त सन्मान करून त्यांच्या गौरव करण्यात येतो. चंद्रपूर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने 8 मार्च रोजी अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिनी त्यांचा सत्कार केला. रस्ते पूल व वैशिष्ट्यपूर्ण इमारतींचे बांधकाम चंद्रपुरात पुर्णत्वास आले आहे, ते संपूर्ण कार्य साखरवाडे यांच्या कार्यकाळातचं !

7 जुलै 2018 रोजी नागपूरच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात तून पदोन्नतीवर आलेल्या सुषमा साखरवाडे यांनी चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार सांभाळला. जिल्ह्यातील सा. बां. विभागामध्ये ३४ व्या अधिक्षक अभियंता म्हणून सुषमा साखरवाडे या पहिल्या महिला अधिक्षक अभियंता आहेत. आतापावेतो 33 पूरूष अधीक्षक अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार बघितला आहे. साखरवाडे यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात स्थापत्यशास्त्रातील अनेक नाविन्यपूर्ण कार्ये झालीत. बल्लारशा रोड वरील स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती असलेले सैनिक स्कूल, विसापूर जवळील नाविण्यपूर्ण विविध इमारतींनी नटलेले बॉटनिकल गार्डन, मूल रोडवरील वन प्रबोधनी, दाताळा केबल स्ट्रीट पुल, चंद्रपूर शहरांमधील जिल्हा कोषागार भवन, म्हाडा कॉलनीत असलेली सिकल्सेल इमारत तसेच चिचपल्ली जवळील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पोंभुर्णा येथील नगरपंचायत ची व्हाईट हाऊस कलाकृती असलेली इमारत, पोंभूर्णा-गडचिरोली जोडणारा देखणा घाटकुळ पूलिया यासारखे अनेक रस्ते पूल व इमारती चंद्रपूर जिल्ह्यात सा.बां. मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांच्या मार्गदर्शनात निर्माण आहेत, यातील काहींचे उद्घाटन झाले आहे तर काही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थापत्यशास्त्रातील या नाविन्यपूर्ण कार्याला भविष्यात ओळखले जाणार आहे. सा.बां. विभागात आपल्या कार्यकर्तुत्वाने व मृदू स्वभावाने सा.बां. विभागात साखरवाडे यांनी आपली वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या याच कार्याचा महिलादिनी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार, इंजिनीयर मनोज जुनोनकर, इंजिनिअर चव्हाण, अभियंता स्वप्निल राठोड, उपकार्यकारी अभियंता मेंढे, अभियंता संजय राठोड, उप कार्यकारी अभियंता मुकेश टांगले इत्यादींची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या