जनगणनेसाठी डॉ. जीवतोडे यांच्या नेतृत्वात ओबीसी रस्त्यावर !




चंद्रपूर : मागील अनेक वर्षापासून ओबीसींना आरक्षण मिळावी यासाठी लढा दिला जात आहे. सरकार ओबीसीच्या आरक्षणावर गंभीर नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मतांचे राजकारण करण्याचा झाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी सोमवारी (दि. ७) दुपारी १२.00 वाजता स्थानिक वरोरा नाका चौक येथे डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन घोषणांच्या गर्जना करीत हजारो ओबीसींच्या उपस्थितीत करण्यात आले.

राजकीय पक्षांनी आवाज उठवावा - डॉ. जीवतोडे

मागील अनेक वर्षांपासून ओबीसींच्या मागण्या व समस्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकार सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा घाट घालत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना नाकारून ओबीसींना संविधानिक हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवत आहे. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षण लागू व्हावे, याकरिता सर्वानुमते आवाज उठविला पाहिजे, असे ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले.

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपयर्ंत निवडणुका घेण्यात येऊ नये, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १00 टक्के स्कारलशिप देण्यात यावी तसेच मागील दोन वर्षापासून मॅट्रीकपूर्व स्कारलशिप देण्यात आलेली नाही ती त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, राज्य सरकारने त्वरित वर्ग ३ व ४ पदाची पदभरती लवकरात लवकर घेण्यात यावी, बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी असलेली तीन पिढय़ांची अट त्वरित रद्द करण्यात यावी, केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे, एस.सी. व एस. टी. शेतकर्‍यांप्रमाणे ओबीसी शेतकर्‍यांना शासकीय योजना त्वरित सुरू करण्यात याव्या, केंद्र सरकारने क्रिमिलेअरची र्मयादा वाढविण्यात यावी, इत्यादी ओबीसी समाजाच्या मागण्या घेऊन आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पंचायतराज मंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्ष नेते आदींना निवेदन देण्यात आले. ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, नितिन कुकडे, अशोक पोफळे, रविकांत वरारकर, राजेंद्र खाडे, आशीष महातळे, संजय सपाटे, विनायक बोढाले, जोत्सना लालसरे, रवि देवाळकर, रवींद्र टोंगे, अनिल शिंदे, सूर्यकांत खनके, रवी जोगी, मंजुळा डुडुरे, लिलाधर खंगार, दिगांबर चौधरी, श्रीपद मटाले, गणेश आवारी, पारस पिंपळकर, विजय मालेकर, रामराव हरडे, अंकुश कौरासे, पारखी, राजकुमार नागापुरे, रोशन पचारे, प्रेमानंद जोगी, नितिन खरवडे, राकेश खुसपुरे, विठोबा पोले, आनंद चलाख, राकेश पिंपळकर, सिताराम बावनकर, शिवशंकर कोरे, दौलतराव सोनारकर, योगेश पेंटेवार, बंडू लांडे, भास्कर जीवतोडे, दीपक मेंढे, कमलाकर धानोरकर, दिलीप हेपट, प्रवीण जोगी तथा जिल्हाभरातून हजारो ओबीसी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments