खोटं बोलतो पण रेटून बोलतो!



सुखासमाधानाने नांदणारे
गाव पाहिले मी

सुखदुःखात धावून जाणारे
राव पाहिले मी

समता बंधुता सर्वधर्म
समभाव नांदतो जेथे

माणुसकीचे दर्शन घडविणारे
भाव पाहिले मी

वर्मी वार केला
विरोधकांनी कितीही

फुंकर घालता प्रेमाने,
बसणारे घाव पाहिले मी

जिकडे तिकडे सुळसुळाट
वाढला चोरांचा

सापडलेली रक्कम परत
करणारे साव पाहिले मी

तक्रार सामन्यांची सर्वत्र
भ्रष्टाचार बोकाळला

सत्तेत पारदर्शी कारभार
करणारे नाव पाहिले मी

-खेमदेव कन्नमवार, चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या