मनसेचे कोरपना तालुकाध्यक्ष कांबळे यांनी व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरीसह उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, स्थानांतरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा !
नागरिकांना होणारा त्रास बघून न.प. मुख्याधिकारी व नगरसेवकांनाही विशेष सभा घेण्यासाठी दिले निवेदन !
चंद्रपूर (वि.प्रति.) : गडचांदूर शहरातील मध्यभागी असलेल्या अचानक दुर्गा पुजा उत्सव समिती दुर्गा मंदिराला लागून असलेली गुलाब शेंद्रे यांचे देशी दारू भट्टी मुळे दारूड्या पासून नागरिक, बचत गटाच्या महिला, शाळकरी मुले, तसेच मुख्य बाजारपेठ असल्यामूळे ग्राहक व व्यापाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून मागील काही दिवसांपूर्वी भर रस्त्यावर ग्राहकाला झालेली अमानुष मारहाण व दारूड्यांचा रोजचा वाढलेला त्रास बघता कोरपना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे व व्यापाऱ्यांनी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग व चंद्रपुरचे जिल्हाधिकारी यांना शेद्रे यांच्या देशी दारू दुकानाचे स्थानांतरण करा स्थानांतरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. भरवस्तीत असलेल्या शेंद्रे यांच्या देशी दारू दुकानामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा अगदी समोरच असल्यामुळे बचत गटाच्या महिलांना याठिकाणी नेहमीच येणे-जाणे असते देशी दारुड्यांच्या त्यांना भयंकर त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या दारू दुकानाचे अन्यत्र स्थानांतरण करण्यात यावे यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून अनेकदा निवेदने देऊन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मनसेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे, अशी माहिती कोरपना तालुका मनसे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी दिली आहे.
स्थानांतरासाठी विशेष सभा घेण्यासाठी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सह नगरसेवकांही दिले निवेदन !
ज्या देशी दारू दुकान त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ते देशी दारू दुकान स्थानांतरण करावे, यासाठी नगर परिषद गडचंदुर एका विशेष सभेचे आयोजन करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी, नगराध्यक्षांसह नगरसेवकांनाही देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे कॉग्रेस 5+ राकां 4= असे 9 मिळून गडचंदुर नगर परिषद मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असून काँग्रेसच्या नगराध्यक्ष तर राकॉंचे नगर उपाध्यक्ष आहे. वादग्रस्त असलेले शेंद्रे यांचे दुकान ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आणि काँग्रेसचे विक्रम येरणे व राकांच्या कल्पनाताई अरूण निमजे या नगरसेविका आहेत. विशेष बाब म्हणजे कल्पनाताई निमजे या न.प. मध्ये महिला व बालकल्याण सभापती या पदावर आहेत. सत्ताधाऱ्यांमधून अनेकांचे दारूची दुकाने किंवा भागीदारी असल्यामुळे दारू दुकानांचे स्थानांतरण करण्यात त्यांना रस नाही असे सांगण्यात येते.
न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांचेमध्येचं आहे स्थानांतरणासाठी आहे दमखम !!
गडचांदुर नगर परिषद ने गडचांदूर शहरातील देशी दारू दुकानांना शहराबाहेर स्थानांतरण करावे यासाठी यापुर्वी अनेक आंदोलने झाली, निवेदनही देण्यात आलीत. न.प. ने विशेष सभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी ही
निवेदने देण्यात आली परंतु कोणत्याही नगरसेवकांनी विशेष सभा घेण्यात "रस" दाखविला नाही. यामागे हे "आर्थिक" कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. गडचांदुर नगर परिषद चे उपाध्यक्ष राकॉंचे युवा नेते शरद जोगी यांचे मध्येचं नागरिकांच्या समस्या बघून त्याची दखल घेऊन दारू दुकानांचे स्थानांतरण करण्याचे काम करण्याची दमखम असल्याचे दिसते. सध्याच्या राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांसोबत शरद जोगी यांचे घनिष्ठ संबंध असून जिल्ह्यात राकॉंचे प्रदेशाध्यक्ष नाम. जयंतदादा पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे कुणीही आले तर त्यांना शरद जोगी नगराच्या समस्या घेऊन भेट घेत असतात व छायाचित्रही अवश्य काढीत असतात. एवढी पोहोच असलेला गडचांदूर शहराचा हा युवा नेताचं शहराची ही समस्या विशेष सभा घेऊन प्रश्न मार्गी लावू शकतो. यासंदर्भात शरद जोगी यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता "दारू दुकानांचे शहराबाहेर स्थानांतरण व्हायलाचं हवे. काँग्रेसच्या कोणत्याही एखाद्या नगरसेवकाने तसे पत्र सादर केल्यास त्याच्यासोबत आपण स्वतः राहू आपल्या सोबत आपले तीन नगरसेवकही राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली." न.प. उपाध्यक्ष शरद जोगी फक्त याच्यामध्येचं दुकानांना शहराबाहेर स्थानंतरण करण्याची दमखम आहे, असे म्हणावे लागेल.
स्थानांतरण देशी दारू दुकानाचे कां? विरोधी पक्षनेते नगरसेवक अरुण डोहे यांचा सवाल!
यासंदर्भात भाजपचे विरोधी पक्षनेते अरुण डोहे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी स्थानांतरण करायचे आहे तर देशी दारू दुकानांचे कां? बार व अन्य दारू दुकानांचे ही स्थानांतरण व्हायला हवे. गडचांदूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या दुर्गा माता मंदिर जवळ एक परमिट रूम आहे. वीस फुटाच्या अंतरावर असलेल्या परमीटरूम चे सुद्धा स्थानांतरण व्हायला हवे. विशेष सभेमध्ये दारू दुकांनाविषयी भेदभाव न करता विषय घेण्यात येत असल्यास या प्रस्तावाला आमचेही समर्थंन राहील. गडचांदूर न.प. मध्ये भाजपचे फक्त दोन नगरसेवक असून विरोधी पक्षाची दमदार भुमिका भाजपने गडचांदूरमध्ये बजावली आहे.
गडचांदूर न.प. मध्ये पाच नगरसेवक हे शिवसेनेचे असून कोणतीही ठाम भुमिका घेण्यात शिवसेना आजपावेतो सक्षम ठरली नाही. जनप्रश्न मार्गी लावणे, सभागृहात एखादा मूद्दा लावून धरणे हे मात्र पाच नगरसेवकांचा मोठा पक्ष असलेल्या गडचांदूरात कधी जमले नाही. शिवसेना गडचांदूरात एक केंद्रीत असल्याचे म्हटल्या जाते. आणि ते सत्य ही आहे
0 टिप्पण्या