रा.कॉं. च्याकार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन !



पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत नाम. प्राजक्त तनपुरे हे मांडणार चंद्रपूर जिल्हाचा अहवाल !

चंद्रपूर (का.प्रति.)
आगामी काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या तयारीचा आढावा आणि तालुकानिहाय वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा.ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत २३ मे रोजी चंद्रपुरात, जिल्ह्यातील ६ विधानसभा क्षेत्रातील सर्व राष्ट्रवादी, राष्ट्रवादी महिला,राष्ट्रवादी युवक या संघटनांचे सर्व तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि निवडक जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे बैठक संपन्न झाली,बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.मोरेश्वर टेमुर्डे,श्री.बाबासाहेब वासाडे,सौ.बेबीताई उईके,डि. आरिकर,नितीन भटारकर, दीपक जयस्वाल, अरुण निमजे, सुमित समर्थ, जयंत टेमुर्डे, डॉ.रघुनाथ बोरकर,सुनील काळे हे विधानसभा अध्यक्ष,तर राजू मुरकुटे,विनोद नवघडे,मनोज सैनी,इब्राहिम शेख, बादल उराडे,महादेव देवतळे,महेश जेंगठे,हिराजी पावडे,दामोधर गरपल्लिवारi,संतोष देरकर,अखिब शेख,शरद जोगी,सुधाकर रोहानकर,दिलीप पिट्टलवार,अविनाश ढेंगळें,सै.आबिद अली,सुनील मैंद,रणजित चंदेल,शरद मानकर,सुरेश पाईकराव,नेरकर,मुनाज शेख,रफीक निजामी,सुनील अर्कीलवार,प्रवीण काकडे,उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी जिल्ह्यातील सर्व ६ विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पालिका आणि एक नगर पंचायत निवडणुकीच्या तयारीबाबत विस्तृत अहवाल मा.ना.प्राजक्त तनपुरे यांच्या समक्ष मांडला.यावर सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा झाली.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष, यांनी आपापल्या तालुक्यात या निवडणुकांच्या तयारीचा पक्ष अहवाल ना.तनपूरे यांच्या समक्ष मांडला,आणि जिल्ह्यातून चांगल्या निकालाची हमी दिली.
ना.प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याच आठवड्यात मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत चंद्रपूर जिल्हाचा अहवाल मा.श्री.प्राजक्त तनपुरे हे मांडणार आहेत.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.जिल्हाभरातून पदाधिकाऱ्यांबरोबरच मोठ्या संख्येने कार्यकर्तेही आजच्या बैठकीला उपस्थित झाले.

Post a Comment

0 Comments