नियोजन भवनातील बैठका, उपस्थितांची गर्दी, समस्यांचे होणारे समाधान ! #sudhir mungantiwar



अधिकाऱ्यांची उडणारी तारांबळ अशी वाखाणण्याजोगी सुधिरभाऊंची कार्यपद्धती !

“हे सारे येते कुठून भाऊ?"

चंद्रपूर (वि. प्रति. )

    

चंद्रपूरातील नियोजन भवनात युतीच्या काळात व नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकदा पत्रकारांना जाता आले. आढावा बैठका, अधिकाऱ्यांशी मंत्र्यांसोबत जनतेच्या समस्यांविषयी चर्चा आणि अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न होत असतो.

जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतित अमूल्य असे स्थान असते. खासदार व आमदार यांची कामे असोत वा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्व असते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पाठपुरावा करणारे एखादे स्वतंत्र कार्यालय असावे तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना हायटेक करण्यात जिल्ह्यात नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते, असे तत्कालिन वित्त व नियोजन मंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांना वाटले आणि त्यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी शेजारी सुसज्ज असे नियोजन भवन साकारण्यात आले. याच नियोजन भवनात आज योगायोगाने उपस्थित राहण्याच्या मिळालेल्या संधीतुन वाखाणण्याजोगी भाऊंची शैली बघावयास व अनुभवयास मिळाली. कोणताही अनुभव नसतांना मागील खेपेला त्यांना वित्त-नियोजन, वन मंत्रालय देण्यात आले. काहीतरी देऊन समाधान करायचे आहे म्हणून पुर्वी वन विभागाची भेट मंत्र्यांना देण्यात येत होती. त्याचे “सोने” त्यांचेकडे वनमंत्रालयाला त्यांनी करून दाखविले. महाराष्ट्राच्या वनमंत्रालयाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेली आहे. आत्ता त्यांचेकडे वन मंत्रालयासोबतचं सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्रालय सोपविण्यात आले आहे. मुनगंटीवारांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांनी व्यक्त केले होते. संपादकांच्या व विद्वान पत्रकारांच्या विद्वतेला आव्हान देत ते वनमंत्रालयाला प्रमाणे सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्रालय अग्रक्रमावर घेऊन येतील यात यत्किंचीत ही शंका नाही.

    आज सोमवार दि. २८ रोजी सकाळी ११.०० वा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सादरीकरण बैठकीचे आयोजन राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या उपस्थितीत नियोजन भवनामध्ये होणार होते. त्यांच्या दैनंदिन दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये असा कार्यक्रम आला होता. सकाळी ११ वाजता प्रारंभ होणारा हा सादरीकरण १२ च्या नंतर सुरू झाला. काल बल्लारपूर येथील रेल्वे जंक्शन वर झालेल्या दुर्घटनेसंदर्भात पालकमंत्री यांची रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आकस्मिक चर्चा-बैठक घेण्यात येत असल्यामुळे नियोजन भवनामध्ये त्यांना उशिर होईल असे पुर्वीच त्यांच्या एका कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली होती. #ballarpur railway accident

    सहज उत्सुकतेपोटी पत्रकार या नात्याने त्याठिकाणी आमंत्रित नसतांना ही उपस्थिती दर्शविली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सा.बां. विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व काही नागरिकांची त्याठिकाणी उपस्थिती होती. मागील आढावा बैठकीत काय निश्चित झाले होते, त्याची आजची अवस्था काय? ती कां बरे लांबणीवर जात आहे. त्यात काय अडचणी येत आहे. त्या संबंधात संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या पद्धतीचा पत्रव्यवहार केला? तो केला तर त्याचे प्रतिउत्तर काय मिळाले इथपासुन तर आता त्यावर काय करता येऊ शकते, ती किती दिवसांत, महिन्यात पुर्ण होऊ शकेल असे नाना तऱ्हेचे समस्या निवारणासंबंधात प्रश्नांचे उत्तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यास स्वतः सुधीरभाऊंनी प्रश्न विचारून भांबावून सोडले. वर्क ऑर्डर केंव्हाचा होता, मग त्याला उशिर का होत आहे ? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ? काम उशिरा होत आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचेवर काय कारवाई केली इथपासून तर त्या परिसरातील नागरिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकुन त्या पुर्ण करण्यास काय अडचणी येत आहे. यावर उभे केलेले प्रश्न, अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सांगीतल्या तर त्वरित संबंधित मंत्रालयाचे सचिवांशी आढावा बैठकीमध्येचं फोनवर बोलणे करून ती समस्या मार्गी लावुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या बाबतीत उपाययोजना करून देण्यात नाम. मुनगंटीवारांचा हात कोणीही पकडू शकत नाही, हे अनेकदा वाचण्यात येत होते, प्रत्यक्ष पाहण्यात ही येत होते. आज त्यांची अनुभूती घेता आली. जागरूक प्रतिनिधी कसा असावा याचे सुधीरभाऊ हे उदाहरण आहे. त्यांच्या कार्याची शैली, त्यांचा अभ्यास त्यांची प्रत्येक गोष्ट शिकण्याची ईच्छा, तांत्रिक बाबींविषयी माहिती घेण्याची शैली याची अनेकदा प्रशंसा होतचं असते. बाबुपेठ उड्डाणपुल, घुग्घूस बायपास मार्ग, मुल येथील बायपास मार्ग, त्यासोबतचं ग्रामीण भागातील रस्त्यांविषयी आलेल्या तक्रारी त्याचे करण्यात येणारे निवारण, अधिकाऱ्यांना येणारे दडपण त्याचे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडून काम सुरळीत करण्यात दबाव येत असेल तर सरळ माझेशी संपर्क साधा, परंतु काम मंजुरीप्रमाणेचं टिकावू व सुंदर व्हायला हवे. अशी त्यांचेकडून देण्यात आलेली तंबी व सुधीरभाऊंकडून होणारे समाधान बघता हे “हे सारे येते कुठून?" हा प्रश्न नक्कीच उपस्थितांसमोर येतो. निरर्थक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना ही इतिहासाच्या क्लासमध्ये भुगोलाचे प्रश्न असे मिश्किलपणे दिलेले उत्तर व अधिकाऱ्यांना तुम्ही दिलेल्या शब्दाला प्रमाणेचं वेळेवर व मंजुरीप्रमाणे मजबुत कार्य व्हायला हवे अन्यथा गाठ माझ्याशी आहे, हा समजविण्याचा केलेला प्रयत्न  खरेच वाखाणण्याजोगा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या