दमा, श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक!
हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारीत स्पष्ट होते. एकूण 30 दिवसाच्या महिन्यात 29 दिवस प्रदूषण आढळले तर केवळ 1 दिवस प्रदूषण मुक्त होता.
गुणवत्ता पाहिल्यास 22 दिवस साधारण (Moderate) प्रदूषित तर 7 दिवस अत्यंत प्रदूषित (Poor) दिवस आढळले.
नोव्हेंबरमध्ये खालील तारखाना (1,7,11,15,22,29,30) मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (A Q I -- 201 ते 280 ) असून हे दिवस अति प्रदूषित आढळले .19 नोव्हेंबर हाच एकमेव दिवस शहरासाठी चांगला होता तर उर्वरीत 22 दिवस अतिशय प्रदूषणाचे होते.(AQI- 165 ते 195)
-------------------
AQI-
0-50 चांगला
51-100 साधारण प्रदूशीत
101-200 प्रदूषित
201-300 अति प्रदूषित
301-400 धोकादायक
*आरोग्यावर काय परिणाम*
1) 0 ते 50 AQI (Air quality index) हा आरोग्यासाठी चांगला
2) 51 ते 100 हा आधीच श्वसनाचे रोग्यासाठी त्रासदायक
3) 101 ते 200 दमा,श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक
4)201 ते 300 सर्व नागरिकासाठी धोकादायक असते, अशी माहिती
प्रा. सुरेश चोपणे, चंद्रपुर यांनी दिली आहे.
0 Comments