चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळाचा कारभार म्हणजे 'अळी मिळी गुप चिळी!' The management of Chandrapur Pollution Control Board is 'Ali Mumi Gup Chili!'

चंद्रपूरातील प्रदुषणावर आम. अडबाले यांनी केला प्रश्न उपस्थित !

वि.प. सभापती गोऱ्हे यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे दिले निर्देश !


चंद्रपूर (वि. प्रति . ) : नुकतेच शिक्षक परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत चंद्रपूर येथील जिवघेण्या प्रदुषणाचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर विधानपरिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहे. चंद्रपूरातील प्रदुषण हा नेहमी वृत्ताचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. प्रदुषणासंबंधित वृत्त प्रकाशित झाले की सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमी बंधु यावर प्रश्न उपस्थित केल्या जाते, त्यानंतर मात्र परिस्थिती 'जैसे थे' ! नुकत्याच संपलेल्या वर्षामधील ३६५ दिवसांपैकी ३२० हे प्रदुषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिला होते, त्यानंतर नविन वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये अर्ध्या पेक्षा जास्त दिवस हे प्रदुषित राहिले. परंतु यावर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना उचलण्यात आली नाही.

चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळ ? Chandrapur Pollution Control Board ?

चंद्रपूरात प्रदुषण नियंत्रण मंडळाचे  बस स्टँड समोर उद्योग भवन येथे प्रशस्त प्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांचेकडे प्रदुषित चंद्रपूर जिल्ह्याव्यतिरिक्त आणखी काही जिल्ह्याचा प्रभार असल्यामुळे ते चंद्रपूरच्या कार्यालयात फार कमी उपस्थित राहतात. या विभागाकडे चंद्रपूरातील वाढत्या प्रदुषणावर आळा बसविण्याची जबाबदारी आहे. परंतु चंद्रपूर प्रदुषण नियंत्रणाचा कारभार म्हणजे 'अळी मिळी गुपचिळी!' असा राहिला आहे. उद्योगाशी संबंधित प्रदुषणाच्या तक्रारीवर उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेला हा विभाग कोल वॉशरीज, कोल डेपो, डाबर प्लॅट, सर्व प्रकारचे उद्योग, विज उत्पादन कारखाना, कोळश्याची वाहतुक तथा अन्य सर्व प्रकारच्या उद्योगांना प्रदुषण नियंत्रण करून उद्योग करण्यासाठी एनओसी 'नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र' देतो. त्यानंतर त्यावर आलेल्या तक्रारींचे निवारण करून योग्य ती उपाययोजना करण्याची किंवा संबंधित उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी याच विभागाची आहे. परंतु प्रदुषण पसरविणाऱ्या उद्योगांवर मोठी कारवाई करण्याचे धाडस या विभागाने किंवा या विभागाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांनी कधी बजावले नाही. प्रदुषणासंबंधित आलेल्या तक्रारीनंतर तत्संबंधाने उद्योगांना फक्त 'शो-कॉस (कारणे दाखवा)' नोटीस पाठविण्याचे 'कर्तव्य' करे व त्यांचा विभाग प्रामाणिकपणे बजावत असल्याचे सांगण्यात येते. प्रदुषण विभागाच्या एका नोटीसनंतर प्रदुषित उद्योगांकडून उपाययोजना करून प्रदुषण नियंत्रण आटोक्यात आणल्याचे कागदोपत्री दाखविण्यात प्रदुषण नियंत्रण विभागाचा हातखंडा असल्याचे सांगण्यात येते. कोणत्या उद्योगाला रस्त्यावर पाणी टाकुन धुळ नियंत्रण करावयाची आहे ? कोणत्या उद्योगाला कॅमेरे बसवायचे आहे? कोणत्या प्रदुषीत उद्योगाला प्रदुषण नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या आहेत, याच्या सुचना संबंधित तक्रारी प्राप्त असलेल्या उद्योगांच्या संचालकांना देण्यात येतात व यावर जिल्हा कागदोपत्री प्रदुषणापासुन कसा नियंत्रीत आणता येईल याकडे विशेष लक्ष संबंधिताकडून दिले जाते. चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपुरात शोभेची वास्तू झाली आहे. 

प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका ?

चंद्रपूरातील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवल्या आहेत. दमा, त्वचा रोग, श्वसनरोग, हृदयविकार अश्या अनेक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. फक्त प्रदुषणाचा अहवाल आला की खडबडून जागे व्हायचे सोंग करायचे आणि नंतर पुन्हा 'जैसे थे' ! अशी स्थिती प्रदुषित चंद्रपूर जिल्ह्याची आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आत्तापावेतो कोण-कोणत्या प्रदुषित उद्योगासंबंधात तक्रारी प्राप्त झाल्या व त्यावर कोणत्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी केली तर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदुषणाचे 'गुपित' बाहेर येईल व चंद्रपूर जिल्हा प्रदुषणापासुन थोड्या बहु प्रमाणात का होईना वाचु शकेल. अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे.‘त्या’ तक्रारी अद्यापपावेतो ही धुळखात !

चंद्रपूरातील नेरी, नेहानगरी, कोंडी, दुर्गापूर, झोपडपट्टी समतानगर या गावाला लागुन महाऔष्णिक विद्युत केंद्राचे व वेकोलीचे बंकर आहेत. वेकोलीचे बंकर मध्ये दुर्गापूरच्या कोळसा खाणीतून कोळसा आणुन जमा केला जातो नंतर हा कोळसा महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या बंकर मध्ये कन्व्हेंबर बेल्ट च्या मदतीने पाठविला जातो, सदर बंकर मधून कोळसा वाहुन नेत असतांना आजुबाजुच्या गावात व परिसरात धुळ शिरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात प्रदुषणच्या जिवघेण्या समस्येशी ग्रस्त असलेल्या गावकऱ्यांनी संबंधित विभागाला सन २०२० पासुन अनेकदा तक्रारी - निवेदने दिले आहेत. परंतु संबंधित विभागाने यावर कोणताही तोडगा अद्यापपावेतो काढलेला नाही. या अन्यायाच्या विरोधात २७ मार्च २०२३ पासुन आंदोलन करण्याचा इशारा नुकताच राष्ट्रीय मागासवर्गीय सामाजिक संघटना, चंद्रपूर या संघटनेने दिला आहे, असे एक नाही अनेक उदाहरणे प्रदुषण नियंत्रणासंबंधित गंभीर नसलेल्या विभागाचे जिल्ह्यात बघायला मिळतील.

Post a Comment

0 Comments