प्रा. सुरेश चोपणे ह्यांना वनराई तर्फे वन संवर्धन पुरस्कार ! Prof. Forest Conservation Award by Vanrai to Suresh Chopane!



वन दिनाचे औचित्याने मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर येथे पुरस्कार प्रदान!!

चंद्रपूर : प्रा. सुरेश चोपणे ह्यांना वनराई फाउंडेशन, नागपूर तथा महाराष्ट्र राज्य वन रक्षक व पदोन्नत वनपाल संघटना,महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी संघटना ह्यांचे संयुक्त विद्यमाने २०२३ चा स्व उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार जागतिक वन दिनी जाहीर करण्यात आला होता. २३/३/२०२३ रोजी हा पुरस्कार प्रा. सुरेश चोपणे ह्यांना नागपूर येथे एका भव्य आणि भरगच्च समारंभात प्रदान करण्यात आला.
 दरवर्षी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून विदर्भातील वन संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचे पहिले मुख्य वन संरक्षक स्व उत्तमराव पाटिल ह्यांचे स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.ह्या वर्षीचा हा पुरस्कार चंद्रपुर येथील वन,पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते ,ग्रीन प्लानेट सोसायटी चे अध्यक्ष तथा केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाचे सदस्य प्रा सुरेश चोपणे ह्याना प्रदान करण्यात आला.
       जागतिक वन दिनाचे निमित्ताने नागपूर येथे काल पुरस्कार समारंभ श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह,शंकरनगर चौक येथे आयोजित करण्यात आला होता.ह्या भव्य समारंभाचे अध्यक्षस्थानि वनराई फाउंडेशन चे अध्यक्ष जेष्ठ पर्यावरणवादी गिरीश गांधी होते,महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक मा वाय. एल.पी राव ह्यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ता चे निवासी संपादक देवेन्द्र गावंडे हे होते.मंचावर वन संरक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, वनराई फाउंडेशन चे डॉ पिनाक दंदे,महाराष्ट्र राज्य वनरक्षक संघटनेचे श्री माधव मानमोडे आणि बि बि पाटील उपस्थित होते.
      जेष्ठ पर्यावरणवादी व वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, मुख्य वन संरक्षक डॉ राव आणि पत्रकार देवेंद्र गावंडे ह्यांनी पुरस्कार प्राप्त सुरेश चोपणे ह्यांच्या वन,वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्याची प्रशंसा केली आणि तसेच भविष्यात त्यांचे हातुन वन संवर्धनाचे भरीव कामगिरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पुरस्कार समारंभाचे प्रास्ताविक वनसंघटनेचे अध्यक्ष अजय पाटील ह्यानी तर संचालन वनराई चे नितीन जतकर ह्यानी केले.समारंभाला नागपूर मधील जेस्ट पर्यावरणवादि कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments

  1. बहोत बहोत बधाई

    ReplyDelete